देशात गडबड करणारा जन्माला यायचा आहे, आम्ही पाकिस्तानात जाऊन ठोकतो, गुलाबराव पाटील यांचा राज ठाकरेंना टोला
राज ठाकरे यांनी काल केलेल्या एका वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देशात गडबड करणारा माईचा लाल अजून जन्माला यायचा आहे असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

देशात येत्या काही महिन्यात मोठी गडबड होण्याची शक्यता आहे. एक वेळ अशी येईल की देशाला पंतप्रधानच नसेल असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. या वक्तव्याचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात समाचार घेतला आहे. देशात गडबड करणारा मायचा लाल अजून जन्माला यायचा आहे. हे नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. कोणी गडबड केली आम्ही सरळ पाकिस्तानात जाऊन ठोकतो अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
देशातील निवडणूका ईव्हीएमवर व्हायला नकोत. जगात आफ्रीकेतील काही देश आणि काही युरोपातले देश वगळता ईव्हीएम कुठेच वापरले जात नाही. मग भारतात का वापरले जाते ? फ्रान्समध्ये एक नागरिक कोर्टात गेल्याने ईव्हीएम रद्दबातल होऊन बॅलेट पेपरवर निवडणूका पुन्हा सुरु झाल्या. या सरकारच्या विरोधात राग लोक व्यक्त करत आहेत. पुढील ४ ते ५ महिन्यात काही तरी मोठी गडबड होणार आहे देशात. अख्खा देश रस्त्यावर आला तरी मला काही आश्चर्य वाटणार नाही. मधला काही काळात देशाला पंतप्रधानच नसेल असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले होते. त्याला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की देशात गडबड करणारा अजून मायचा लाल जन्माला यायचा आहे. गडबड करणाऱ्या आम्ही पाकिस्तानात जाऊन ठोकतो असाही टोला पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला.
संजय राऊत म्हणजे वापरलेली कॅसेट
संजय राऊत यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून मंत्री गुलाबराव पाटल यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.संजय राऊत ही वापरलेली कॅसेट आहे. प्रत्येकाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटते, मग माझी भूमिका मांडली त्यात माझी चूक काय? मी सुद्धा आमदार व्हावे, मंत्री व्हावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि मी झालो असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.