मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर, या 11 जणांना संधी

भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात धाराशिव लातूर बीडमधून बसवराज पाटील, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर, या 11 जणांना संधी
BJP MLC Candidate List
Image Credit source: Google
| Updated on: May 31, 2026 | 10:48 PM

भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात धाराशिव लातूर बीडमधून बसवराज पाटील, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच जळगाव मधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून डॉ.राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार आता उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपचे 11 उमेदवार 

  1. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – श्री अरुण लखानी
  2. भंडारा-गोंदिया – श्री अविनाश ब्राह्मणकर
  3. अमरावती – श्री प्रविण पोटे पाटील
  4. सांगली-सातारा – श्री धैर्यशील कदम
  5. सोलापूर – श्री राजेंद्र राऊत
  6. अहिल्यानगर – श्री प्राजक्त तनपुरे
  7. छत्रपती संभाजीनगर-जालना – श्री सुहास शिरसाट
  8. नांदेड – श्री अमर राजूरकर
  9. धाराशिव-लातूर-बीड – श्री बसवराज पाटील
  10. जळगाव – श्री.नंदकिशोर महाजन
  11. नागपूर – डॉ.राजीव पोतदार

दिल्लीतून झाली घोषणा

भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी कुणाला संधी मिळणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. नावं निश्चित करण्यासाठी अनेक बैठकाही झाल्या होत्या. राज्यात झालेल्या बैठकांमध्ये 48 जणांची नावे फायनल करण्यात आली होती. या 48 नावांची यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर आज दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर आज रात्री या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

संभाजीनगरची जागा भाजपकडे

भाजपकडून विधान परिषदेसाठी 11 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर आता संभाजीनगर-जालना मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे. ही जागा आपल्याकडे यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह केला होती. भाजपचे संभाजीनगरचे जिल्हाधक्ष सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. तसेच सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणी यांनाही वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच अलिकडेच भाजपमध्ये सामील झालेले प्राजक्त तनपुरे यांनी अहिल्यानगरमधून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच सोलापूरमधून राजेंद्र राऊत यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला आहे. आता हे सर्व उमेदवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us