प्रतिमा मलीन करणाऱ्या पोस्ट, मजकूर थांबवा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, मोहित कंबोज यांचा इशारा

सोशल मीडियावर माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशार कारवाई केली जाईल, असा इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे. मोहित कंबोज हे राजकारणात सक्रिय असून महाराष्ट्रात तसेच देशातही ते सर्वपरिचित आहेत.

प्रतिमा मलीन करणाऱ्या पोस्ट, मजकूर थांबवा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, मोहित कंबोज यांचा इशारा
mohit kamboj
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 30, 2026 | 7:13 PM

मुंबई : सोशल मीडियावर माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशार कारवाई केली जाईल, असा इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे. मोहित कंबोज हे राजकारणात सक्रिय असून महाराष्ट्रात तसेच देशातही ते सर्वपरिचित आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट करून माझ्याविरोधात दिशाभूल करणारे आणि बनावट रिपोर्ट्स प्रसारित केले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच अशा प्रकारे माझी बदनामी करणे तत्काळ थांबवावे अन्यथा दिवाणी आणि फौजदारी मानहानीच्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलीन केली जात असल्याचा आरोप

मोहित कंबोज यांनी बदनामीकारक पोस्ट, फोटो अपलोड करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिलाय. माझ्याविरोधात सोशल मीडियावर जाणीवपूर्वक आणि सातत्याने बदनामीची मोहीम सुरू आहे. तसेच गेल्या काही आठवड्यांपासून दिशाभूल करणारे आणि बनावट रिपोर्ट्स प्रसारित केले जात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. माझी सार्वजनिक प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलीन करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय.

नेमका काय इशारा दिला?

अशा प्रकारच्या बदनामीकारक मजकुराची निर्मिती, प्रसारण किंवा शेअरिंग थांबवाव, असे आवाहन त्यांनी केले आहे. निराधार किंवा असत्य पोस्ट, रिपोर्ट अथवा कमेंट केल्यास दिवाणी आणि फौजदारी मानहानीच्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

मोहित कंबोज कोण आहेत?

मोहित कंबोज हे Aspect लॉजिस्टिक्स अँड सर्व्हिसेसचे ग्रुप सिईओ आहेत. ते एमकेबी फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष असून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात. महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांचे वेगळे स्थान असून ते सर्वपरिचित आहेत.

Follow Us