VIDEO | कोकण रेल्वेच्या भरावामुळे पुराचा धोका, सुनील तटकरेंकडून रेल्वे अधिकाऱ्यांची कानउघडणी 

| Updated on: Jun 29, 2021 | 11:49 AM

रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी स्वत: रेल्वे ट्रॅकवर उतरुन पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. (MP Sunil Tatkare angry on Konkan railway officials due to various problem) 

VIDEO | कोकण रेल्वेच्या भरावामुळे पुराचा धोका, सुनील तटकरेंकडून रेल्वे अधिकाऱ्यांची कानउघडणी 
Sunil Tatkare angry on Konkan railway officials
Follow us on

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वेच्या दुपदरी ट्रॅकचे काम सुरु आहे. मात्र या प्रकल्पामुळे अनेक गावांना पावसाळ्यात फटका बसतो. याबाबत वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासन याबाबत लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी स्वत: रेल्वे ट्रॅकवर उतरुन पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. (MP Sunil Tatkare angry on Konkan railway officials due to various problem)

कोकण रेल्वेमुळे पावसाळ्यात पुराचा धोका

कोकण रेल्वे हा प्रकल्प कोकणासाठी वरदान ठरला आहे. मात्र या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे काही ठिकाणी वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहे. यापैकी एक महत्त्वाची समस्या म्हणजे दरवर्षी पावसाळ्यात बसणारा पुराचा धोका. कोकण रेल्वे प्रशासनाने दुपदरी ट्रॅकचे काम सुरू केल्यापासून रेल्वे ट्रॅक जवळ असणाऱ्या अनेक गावांना पावसाळ्यात पुराचा फटका बसतो. याबाबत वारंवार सूचना करूनही रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे अनेक नागरिक संतापले आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी

या पार्श्वभूमीवर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आज कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता आणि अन्य प्रमुख अधिकाऱ्यांसह रेल्वे ट्रॅकवर उतरुन पाहणी केली. यावेळी त्यांनी माणगाव स्टेशनचा आढावा घेतला. तसेच स्टेशनच्या आजूबाजूला असलेल्या नाल्यांची कामे वर्षानुवर्षे झालेली नाहीत. त्यामुळे तटकरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. तसेच तातडीने ही नाल्याची काम करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पाहा व्हिडीओ :

(MP Sunil Tatkare angry on Konkan railway officials due to various problem)

संबंधित बातम्या : 

रुटीन चेक-अप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत रुग्णालयात

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचे बीड कनेक्शन, परळीच्या तरुणाला अटक

नाशिकमध्ये काय घडतंय, वाचा तीन मोठ्या बातम्या एकाच क्लिकवर