रुटीन चेक-अप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत रुग्णालयात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रिलायन्स रुग्णालयात (CM Uddhav Thackeray in hospital) पोहोचले. उद्धव ठाकरे हे मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात आज सकाळीच दाखल झाले.

रुटीन चेक-अप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत रुग्णालयात
CM Uddhav Thackeray in hospital for routine check-up


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रिलायन्स रुग्णालयात (CM Uddhav Thackeray in hospital) पोहोचले. उद्धव ठाकरे हे मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात आज सकाळीच दाखल झाले. मुख्यमंत्री नेमकं कशासाठी रुग्णालयात गेले याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नव्हता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार रुटीन चेकअपसाठी मुख्यमंत्री रुग्णालयात गेल्याचं सांगण्यात येत आहे. (Chief Minister Uddhav Thackeray in hospital for routine check-up H. N. Reliance Hospital Mumbai today )

उद्धव ठाकरे हे स्वत: ड्रायव्हिंग करत रुग्णालयात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. केवळ रुटीन चेकअप म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल झाले. यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं रुटीन चेकअप हे लीलावती रुग्णालयात होतं. मात्र उद्धव ठाकरे हे सध्या वर्षा बंगल्यावर असल्याने जवळचं रुग्णालय म्हणून, मुख्यंत्र्यांनी H N रिलायन्स रुग्णालय निवडलं.

रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यावेळी त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार झाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री स्वत:ही रुटीन चेकअपसाठी याच रुग्णालयात पोहोचले.

तासाभराने मुख्यमंत्री रवाना 

तासाभराचं रुटीन चेकअप झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयातून रवाना झाले. दरम्यान, मुख्यमंत्री येत असल्याने रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

राजकीय घडामोडी 

दरम्यान, राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल भेट घेतली होती.  या भेटीनंतर संजय राऊत थेट शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत आहे असं दिसत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

VIDEO : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात

संबंधित बातम्या 

राज ठाकरेंचा लाडका ‘जेम्स’ गेला, राज यांच्या परिवारातील श्वानाचे निधन

संजय राऊत मुख्यमंत्र्यांचा कोणता निरोप घेऊन शरद पवारांच्या भेटीला?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI