नाशिकमध्ये काय घडतंय, वाचा तीन मोठ्या बातम्या एकाच क्लिकवर

नाशिकमध्ये तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका बघता पोलीस प्रशासन हायअलर्टवर पाहायला मिळत आहे. (Nashik three big news Corona Pandemic restriction all you need to know)

नाशिकमध्ये काय घडतंय, वाचा तीन मोठ्या बातम्या एकाच क्लिकवर
Nashik Municipal corporation
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 10:57 AM

नाशिक : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाशिकसह जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून जमावबंदी, संचारबंदी आणि नाकाबंदी सुरू आहे. नाशिक शहरात पहाटे 5 ते संध्याकाळी 6 पर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. (Nashik three big news Corona Pandemic restriction all you need to know)

या काळात 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच बाजारातील गर्दी बघता बाजारात जाणाऱ्यांसाठी पासची व्यवस्था करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे. नाशिकमध्ये तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका बघता पोलीस प्रशासन हायअलर्टवर पाहायला मिळत आहे.

राज्याच्या मुख्य सचिवांकडून नाशिक महापालिकेचा आढावा

तर दुसरीकडे नाशिकमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्याच्या मुख्य सचिवांनी नाशिक महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतला. नाशिकमध्ये ऑक्सिजन पुरवठा पुरेसा आहे का? याबाबतही माहिती घेण्यात आली. नाशिक मनपा दररोज 240 टन ऑक्सिजन पुरेल एवढा साठा ठेवणार आहे. तसेच 27 पीएसए प्लांटची जिल्ह्यात निर्मिती झाल्याची माहिती आहे. तर अधिक तयारीसाठी मनपाने 2000 जम्बो सिलेंडर खरेदीची करण्याची ही तयारी दर्शवली आहे. नाशिक शहरातील कोव्हिडं सेंटरसोबत जम्बो सिलेंडर उपलब्ध केले जाणार आहेत.

 नाशिक महापालिकेची महासभा, विविध विषयांवर चर्चा

नाशिक महापालिकेची आजची महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज विशेष महासभा बोलावण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील स्मार्ट कामांबाबत आक्षेप घेतला गेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अर्धवट झालेल्या स्मार्ट सिटीच्या कामांबाबत नगरसेवक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. यावेळी गॅस पाईपलाईन, नोकरभरती, बस सेवा यांसह विविध विषयांवर चर्चा केली जाऊ शकते.

(Nashik three big news Corona Pandemic restriction all you need to know)

संबंधित बातम्या :

विकेंडला पर्यटनाला जाण्याचा प्लॅन करताय, विनाकारण घराबाहेर पडल्यास हमखास कारवाई , नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर

कोरोना डेल्टा विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन सतर्क, जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू

शैक्षणिक शुल्क माफ करा, अन्यथा 5 जुलैला मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन, AISF विद्यार्थी संघटनेचा इशारा

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.