मुंबईत पुन्हा बुरख्यावरून वाद पेटला; हॉस्पिटलमध्ये प्रवेशासाठी महिलेला ठेवली एक अट, कारण विचारताच सुरक्षा रक्षकाने…
मुंबईत पुन्हा बुरख्यावरून वाद पेटला आहे. बुरखा घातल्याने हॉस्पिटलमध्ये प्रवेशासाठी महिलेला सुरक्षारक्षकाने बुरखा काढण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबईत पुन्हा बुरख्यावरून वाद पेटला आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या चेंबूरमधील एका कॉलेजमध्ये बुरखा घालण्यास बंदी घातली होती. बुरखा घालणाऱ्या विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये प्रवेश नाकरण्यात येता होता. त्यानंतर आता मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या या हॉस्पिटलमध्ये एका बुरखा घातलेल्या महिला प्रवेश रोखल्याचे समोर आलं आहे. आता या हॉस्पिटलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. कूपर हॉस्पिटलमधील या प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक बुरखा घातलेल्या महिलेला हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये वकील महिला या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा त्यांना प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. वकील झहरा शेख यांना हॉस्पिटलमध्ये प्रवेशासाठी बुरखा काढण्याची अट ठेवण्यात आली. त्यानंतर वकील झहरा या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसत आहेत.
नेमकं काय घडलं?
झहरा शेख या नातेवाईकांना भेटण्यासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये (Hospital) गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण देखील सोबत होती. मैत्रिणीने देखील बुरखा घातला होता. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करत असताना सुरक्षा कर्मचार्याने दोघांना अडवलं. सुरक्षा रक्षकाने सांगितलं की, हॉस्पिटलमधून मुले चोरी होतात. त्यामुळे त्यांनी दोघांना बुरखा हटवण्यास सांगितला. परंतु बुरखा काढल्याने धार्मिक आणि गोपनीयतेतचं उल्लघंन होत असल्याचा दावा झहरा शेख यांनी केला. त्याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचे वकील महिलेने सांगितले. आता या व्हायरल व्हिडिओवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या व्हायरल व्हिडिओवरून प्रशासनाची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. हॉस्पिटलमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुरक्षा रक्षकाने अडवल्याने रुग्णालयात धर्म पाहून प्रवेश दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता या प्रकारावर हॉस्पिटल प्रशासनाची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.