मुंबईतील आंदोलनाआधी अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात? मुंबई पोलिसांनी काय स्पष्टीकरण दिलं? वाचा

मुंबईतील आंदोलनाआधी अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता त्यावर मुंबई पोलिसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील आंदोलनाआधी अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात? मुंबई पोलिसांनी काय स्पष्टीकरण दिलं? वाचा
abhijeet dipke
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 10:57 AM

कॉक्रोच जनता पार्टीच्या संस्थापक अभिजीत दिपके यांनी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आंदोलनाचा नारा दिला आहे.  पोलिसांची परवानगी नसताना कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाचा नारा दिलाय. या आंदोलनासाठी कॉक्रोच जनता पार्टीने काल मुंबईच्या विविध भागात प्रचार केला. दिपके आणि त्यांच्या सीजेपी कार्यकर्त्यांनी मरीन ड्राईव्हवर देखील प्रचारासाठी फेरफटका मारला. त्यावेळी अचानक पोलिसांची एन्ट्री झाली. ते दिपकेंना चहाच्या बहाण्याने पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर दिपकेंनी काही वेळ चौकशी करून सोडून दिलं. त्यानंतर दिपकेंना ताब्यात घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. आता त्यावर मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेले स्पष्टीकरण समोर आलं आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, आम्ही अभिजीत दिपकेंना सोबत घेऊन गेलो होतो’. खरंतर दिपके हे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मरीन ड्राइव्हवर होते. लोकांना भेटत होते. त्याचवेळी मरीन ड्राईव्हवर काही पोलीस देखील उपस्थित होते. दिपकेंना ताब्यात घेतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.  सीजेपी संस्थापक दिपके यांच्या टीमचं म्हणणं आहे की, ‘मरीन ड्राइव्हवर एका महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दिपकेंना सोबत येण्यासाठी सांगितले. या अधिकाऱ्यांनी चहा पिण्यासाठी आमंत्रण दिलं. यानंतर दिपके पोलीस स्टेशनला पोहोचले. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काही वेळ चौकशी करत पुन्हा जाण्यास सांगितलं. या दरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, तुमचा चहा बाकी राहिला आहे’.  या प्रकारानंतर दिपके म्हणाले, चहाच्या नावाखाली पोलीस स्टेशनला आणलं. त्यानंतर चहा देखील दिला नाही’.

Loading...

अभिजीत दिपके यांनी आरोप करताना म्हटलं की, मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले, कारण माझा वेळ वाया घालवायचा होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा फोन आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. अभिजीत दिपके यांच्या टीमने या घटनेचा व्हिडिओ तयार केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता या व्हिडिओवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिपकेंना ताब्यात घेतलं नसल्याचे म्हटलं आहे.  दिपके यांच्या टीमने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सगळा घटनाक्रम दिसत आहे. हा व्हिडिओनंतर आता चर्चांना उधाण आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us