प्रवाशांना खूशखबर… रेल्वे स्थानकांवरील वडापाव, समोसा महागणार नाही, मध्य रेल्वे बॅकफूटवर, आदेश रद्द

मध्य रेल्वेने १ जूनपासून वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून आता रेल्वे स्टेशनवरील वडापाव, समोसा आणि इतर पदार्थांचे दर पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. मुंबईकरांच्या खिशाला बसणारा अतिरिक्त भार टळला आहे.

प्रवाशांना खूशखबर... रेल्वे स्थानकांवरील वडापाव, समोसा महागणार नाही, मध्य रेल्वे बॅकफूटवर, आदेश रद्द
रेल्वे स्टेशनवरील खाद्यपदार्थ्यांच्या दरात वाढ होणार नाही
| Updated on: May 27, 2026 | 12:07 PM

मुंबईकरांच्या आवडीचं खाद्य म्हणजे वडापाव. पाऊस आला, खा वडापाव, छोटी भूक लागली , खा वडापाव.. गरम कुरकुरीत वडापाव खायला काही निमित्त लागत नाही… मात्र मध्य रेल्वेच्या स्टॉलवर मिळणाऱ्या वडापावची किंमत वाढणार असल्याची बातमी समोर आली आणि प्रवाशांच्या खिशाला भार बसणार अशी चर्चा सुरू झाली. रेल्वे स्टॉलवरी खाद्यपदार्थांचे दर 1 जूनपासून वाढवण्याचा प्रस्ताव होता. याच संदर्भात आता एका मोठी अपडेट समोर आली आहे.

रेल्वे स्थानकातील खाद्य पदार्थांचे भाव वाढवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत आधीचेच दर लागू राहणार आहेत. येत्या 1 जुनपासून मध्य रेल्वेच्या स्टॉलवरील वडापाव आणि समोस्याचे भाव वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार होती. मात्र आता मध्य रेल्वे बॅकफूटवर गेली असून खाद्यपदार्थांचे भाव न वाढता, जैसे थे राहणार असल्याचे समजते.

Loading...

नवीन दर वाढीनुसार वडापाव 20 रुपये होणार होता, तसेच स्टॉल्सवर काही नवीन पदार्थ समाविष्ट करण्यात येणार होते. 1 जूनपासून याची अंमलबजावणी होणार होती, मात्र आता पुढील आदेश येईपर्यंत जुनेच दर लावण्यात येणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

किती वाढणार होते भाव ?

मध्य पूर्वेतील संकटामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढल्यानंतर आता लोकांचे आवडते खाद्यपदार्थही महाग होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. सर्वसामान्यांना मोठा धक्का देत मध्य रेल्वेने वडापावच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे 1 जूनपासून वडापाव, समोशाचे दर वाढणार होते.

त्यामुळे 13 रुपयांचा वडापाव 20 ला मिळणार होता. मेन्यूमधील इतर लोकप्रिय स्नॅक्समध्ये व्हेज समोसा 20 रुपये तसेच व्हेज पफ आणि साबुदाणा वडा यांचेही भाव 20 रुपये होणार होते. मात्र हे भाव न वाढवण्याचा निर्णय आत मध्ये रेल्वेने घेतला आहे.

तसेच प्रवाशांमध्ये लोकप्रिय असलेली पावभाजी 50 रुपयांना आणि व्हेज पिझ्झादेखील 50 रुपये या नवीन दरात उपलब्ध होणार होता. दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये, मसाला डोसाची किंमत 35 रुपये आहे आणि सांबार/चटणीसोबत दोन इडलीची किंमत 30 रुपयेहोती. मात्र हे दर आता जैसे थे च असतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us