टायगरवर गोळीबार होताच शिंदेंनी फोन फिरवला, अख्ख्या बॉलीवूडला दिला शब्द,आता जशास तसा बदला
अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत फायरिंग झाल्याची घटना अतिशय गंभीर आहे. माझी मुंबई पोलिसांशी माझी चर्चा झाली आहे. या गोळीबारानंतर पथके रवाना झाली आहेत. त्यांना जशास तशे उत्तर दिले जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत फायरिंग झाल्याची घटना अतिशय गंभीर आहे. माझी मुंबई पोलिसांशी माझी चर्चा झाली आहे. या गोळीबारानंतर पथके रवाना झाली आहेत. त्यांना जशास तशे उत्तर दिले जाईल, टायगर श्रॉफशी माझे बोलणे झाले आहे. जे कोणी कायद्या सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार आहे. मुंबई पोलिसांनी अनेक टीम तयार केल्या आहे. नव्वदच्या दशकात गँगवॉरचा मुकाबला मुंबई पोलिसांनी केला होता. त्याच प्रकारे त्यांना ठेचून काढले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर जुहु येथील पुष्पापार्क येथे गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सायंकाळी सातच्या सुमाराम जुहूच्या पुष्पा पार्क येथे हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू कारवर अत्यंत जवळून गोळीबार केला आहे. त्यावेळी सुदैवाने टायगर श्रॉफ याला गोळी लागली नाही. मात्र, त्याचा चालक आणि एक रिक्षावाला यात जखमी झाले. या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. त्यानंतर टायगर श्रॉफ याचा चालकाच्या हाताला गोळी लागली असल्याने त्याला नानावटी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणात पोलिसांची १५ पथके नेमण्यात आली आहेत. या प्रकरणात एका संशियिताला ताब्यातही घेण्यात आले आहे.
कलाकारांनी कोणासही घाबरण्याची गरज नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण या प्रकरणात पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असून मुंबईत कोणतेही गँगवॉर खपवून घेतले जाणार नाही. कलाकारांनी घाबरण्याची गरज नाही. माझे टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. कलाकारांनी कोणासही घाबरण्याची गरज नाही. आम्ही ज्या कलाकारांना संरक्षण हवे त्यांना ते देऊ या प्रकरणात कोणत्याही गँगची दहशत खपवून घेतली जाणार नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत चोख उत्तर दिले जाईल. ९० च्या दशकात मुंबई पोलिसांनी गँगवॉर ठेचून काढले होते. त्याच प्रकारे जशास तसे उत्तर दिले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.