नेपाळमध्ये जलप्रलय, भेंडवळचं भाकित खरं ठरलं? काय आहे कनेक्शन?
नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या भीषण जलप्रलयाने मोठी जीवितहानी व वित्तहानी झाली. पावसाविना आलेल्या या महापुराची चर्चा भेंडवळच्या भाकिताशी जोडली जात आहे. २० एप्रिलच्या मांडणीत महापूर येण्याचं भाकित होतं, तसेच पृथ्वीचं प्रतीक असलेली 'पुरी' गायब झाल्याने नैसर्गिक आपत्तीचा इशारा होता. नेपाळची ही आपत्ती भेंडवळच्या भाकिताची सत्यता सिद्ध करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

नेपाळमध्ये चार दिवसापूर्वी प्रचंड जलप्रलय आला. हा सर्वात मोठा जलप्रलय असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे पावसाचा एकही थेंब पडलेला नसताना हा महापूर आला. त्यात सहाशेहून अधिक लोक दगावले. हजारो लोक बेपत्ता झाले. अनेक संसार नेस्तनाबूत झाले. अनेक लोक पोरके झाले. नेपाळमधील अनेक गावं आजही अंधारात आहेत. जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच दरम्यान आता एक वेगळी चर्चा होताना दिसत आहे. ती म्हणजे भेंडवळच्या भाकिताची. भेंडवळच्या भाकिताने यंदा महापूर येण्याचं भाकित वर्तवलं होतं. त्याची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे.
काय होतं भेंडवळचं भाकीत?
बुलढाण्यात 20 एप्रिल 2026 रोजी भेंडवळची मांडणी करण्यात आली होती. यावेळी देश आणि विदेशातील पाऊसमान, राजकीय परिस्थिती आणि युद्ध यावर भाष्य करण्यात आलं होतं. त्यानुसार काही घटना घडल्या आहेत. खासकरून नेपाळचा प्रलय झाल्याने भेंडवळचं भाकीत खरं ठरल्याचं मानलं जात आहे.
महाराष्ट्राबाबतचं भाकीत काय?
भेंडवळच्या मांडणीत महाराष्ट्रातील पाऊस पाण्याचं भाकीत करण्यात आलं होतं आणि हे भाकीत खरं ठरलं आहे. भेंडवळच्या भाकितानुसार जूनमध्ये भरपूर पाऊस सांगितला होता. जुलैमध्ये सर्वसाधारण आणि ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर कमी राहण्याचं भाकीत होतं. काही भागात महापूर येण्याचंही भाकीत होतं. ते खरं ठरलं आहे. महाराष्ट्रासाठी जूनमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी नगण्य पाऊस झाला. जुलैमध्येही जेमतेम पाऊस झाला. ऑगस्टमध्ये पाऊस कमी पडलाय. आणि आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्ये पाऊस ओसरणार आहे. त्यामुळे भेंडवळचं भाकीत खरं झाल्याचं बोललं जात आहे.
नेपाळशी कनेक्शन काय?
भेंडवळने पूरस्थितीचं भाकीत वर्तवलं होतं. विशेष म्हणजे घटावर ठेवलेली ‘पुरी’ गायब झाली होती. पुरी हे पृथ्वीचं प्रतिक मानलं जातं. पुरीच गायब झाल्याने पृथ्वीवर भविष्यात नैसर्गिक आपत्ती येणार असल्याचं या मांडणीतून सांगण्यात आलं होतं. नेपाळमध्ये जलप्रलय आला. शेकडो लोक मेले. सर्वत्र हाहा:कार उडाला. ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे पावसाचा टिपूस न पडता हा हाहाकार उडाला. त्यामुळे भेंडवळच्या भाकिताचं नेपाळच्या नैसर्गिक आपत्तीशी कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे.