महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा मेल, हल्ल्याची तारीख, ग्रेनेड हल्ला कुठे करणार ते ही सांगितलं

मुंबईच्या महापौर कार्यालयाला धमकीचा मेल आला आहे. त्यात बॉम्बस्फोटो कुठे करणार? किती तारखेला करणार? ते सर्व सांगितलं आहे.

महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा मेल, हल्ल्याची तारीख, ग्रेनेड हल्ला कुठे करणार ते ही सांगितलं
Mumbai Mayor office
| Updated on: Oct 23, 2026 | 1:12 PM

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : मुंबईच्या महापौर कार्यालयाला धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ई-मेल मध्ये हल्ल्याची तारीख आणि वेळही सांगण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे शाळेला लक्ष्य करणार असं या मेल मध्ये म्हटलं आहे. ‘खलिस्तान झिंदाबाद’ असं त्या मेलमध्ये लिहिलेलं आहे. ‘शाळा 1 वाजून 11 मिनिटं, अपने बच्चे बचाओ’ असं त्या मेलमध्ये लिहिलं आहे. 31 ऑक्टोबर आणि 27 नोव्हेंबरला हल्ला करण्याची धमकी या ई-मेलमधून देण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरला शाळेवर ग्रेनेड हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. 27 नोव्हेंबरला महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेख आहे. ई-मेलमध्ये खलिस्तान आणि काही संघटनांच्या नावांचा उल्लेख आहे. धमकीच्या ई-मेलमुळे सुरक्षा यंत्रणांसमोर सतर्कतेचे आव्हान निर्माण झाले आहे. ई-मेलची सत्यता, पाठवणाऱ्याची ओळख आणि संभाव्य धोका तपासण्याची आवश्यकता आहे.

पोलिसांकडून ई-मेलची सत्यता तपासणी सुरु झाली आहे. तो कोणी आणि कुठून पाठवला आणि हा खरा धोका आहे का, की केवळ अफवा पसरवण्याचा उद्देश आहे, याचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. महापौर कार्यालय, महालक्ष्मी रेसकोर्स आणि शाळांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Loading...

दादरमधील प्रमुख शाळांनाही धमकीचा मेल

मुंबईतल्या प्रमुख शाळांनाही धमकीवजा ईमेल मिळाला आहे. दादरमधील प्रमुख शाळांना सकाळच्या सुमारास हा धमकी वजा ईमेल आल्याची सूत्रांची माहिती. या धमकी वजा ईमेलची माहिती मिळताच पोलिसांनी शाळांची झडती घेतली. पोलिस तपासात संशयास्पद गोष्टी आढळून आल्या नाहीत. मात्र या धमकीवजा ईमेलमुळे शाळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. दादरमधील 3 ते 4 शाळांना हा ईमेल आल्याची सूत्रांची माहिती. पोलीस मेल करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us