मुंबईत हॉटस्पॉटची संख्या 241 वर, वरळी कोळीवाडा, पवई, धारावी झोपडपट्टी ‘कोरोना’चे हॉटस्पॉट

| Updated on: Apr 04, 2020 | 10:27 AM

दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण सापडल्याने मुंबई कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे मुंबईतील हॉटस्पॉटची संख्या 212 वरुन 241 वर पोहोचली (Corona Hotspot Mumbai) आहे.

मुंबईत हॉटस्पॉटची संख्या 241 वर, वरळी कोळीवाडा, पवई, धारावी झोपडपट्टी कोरोनाचे हॉटस्पॉट
1 एप्रिल 2005 पासून 31मार्च 2020 अशी 15 वर्षाची खर्चाची माहिती त्यात आहे. 1 एप्रिल 2005 पासून 31 मार्च 2020 पर्यंत 31 कोटी 27 लाख 66 हजार 148 रूपये धारावी पुनर्विकास प्रकल्पावर खर्च करण्यात आले आहेत
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 490 पर्यंत पोहोचली (Corona Hotspot Mumbai) आहे. त्यातील 278 रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळले आहे. गेल्या तीन चार दिवसांमध्ये मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यातील काही रुग्ण हे मुंबईच्या झोपडपट्टीत आढळले आहेत. दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण सापडल्याने मुंबई कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे मुंबईतील हॉटस्पॉटची संख्या 212 वरुन 241 वर पोहोचली आहे.

मुंबईमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत  चालला (Corona Hotspot Mumbai) आहे. मुंबईतील झोपडपट्टी भागात रुग्णांची वाढती संख्या सध्या चिंतेचे कारण बनत आहे. वरळी कोळीवाडा, गोवंडी, पवई, घाटकोपर, अंधेरी येथील झोपडपट्टी परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती.

विशेष म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाने शिरकाव केला होता.  धारावीतील एका 56 वर्षीय व्यक्तीचा बुधवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या घरातील सात जणांना होम क्वारंटाईन केले आहे. तसेच तो राहत असलेली इमारत सील केली आहे.

त्यापाठोपाठ वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या मात्र धारावी परिसरात काम करणाऱ्या 52 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. धारावीसारख्या दाटीवाटीने वसलेल्या झोपडीत कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या धारावी कोरोनाच्या रडारवर आली आहे.

धारावीमधील घरे 10 बाय 10 ची असून प्रत्येक घरांमध्ये सात ते आठ किंवा त्यापेक्षा अधिकजण रहातात. तसेच नेहमीच गर्दी असलेल्या धारावीमध्ये सोशल डिस्टनसिंग कसे राखले जाणार हा प्रश्नच निर्माण झाला आहे. धारावीत आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णामुळे महापालिका आणि राज्य आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले (Corona Hotspot Mumbai) आहे.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861