Corona Update : धोका वाढतोय! मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू!

| Updated on: Jun 27, 2022 | 11:51 AM

डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी दोन जणांचे वय हे 90 पेक्षा जास्त होते. तसेच त्यांना हृदयविकार होता. दोन 88 वर्षीय पुरुष आणि एक 43 वर्षीय महिला यांचा देखील यामध्ये समावेश होता. मात्र, या तिघांनाही उच्च रक्तदाबाची समस्या होती. राज्याचे कोविड टास्कफोर्सचे सदस्य डॉ राहुल पंडित म्हणाले की सध्या लाट असल्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीये.

Corona Update : धोका वाढतोय! मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू!
कोरोना रुग्ण
Follow us on

मुंबई : राज्यात सातत्याने कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे मुंबईत (Mumbai) 5 जणांचा मृत्यू झाला. जून महिन्यात कोरोनाने 33 जणांचा बळी घेतला आहे. 33 मृत्यूंपैकी बहुतेक वृद्ध लोक होते किंवा ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग किंवा हृदयाच्या समस्या (Problem) होत्या, असे बीएमसीच्या डॉक्टरांनी सांगितले. मुंबईसह, पुणे आणि ठाण्यामध्येही कोरोना रूग्णसंख्येत वाढ झालीयं. राज्यात कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीयेत. मात्र, कोरोनापासून (Corona) दूर राहण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे अत्यंत महत्वाचे आहे.

इथे पाहा BMC चे Coronavirus Updates

जून महिन्यात कोरोनामुळे 33 जणांचा मृत्यू

डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी दोन जणांचे वय हे 90 पेक्षा जास्त होते. तसेच त्यांना हृदयविकार होता. दोन 88 वर्षीय पुरुष आणि एक 43 वर्षीय महिला यांचा देखील यामध्ये समावेश होता. मात्र, या तिघांनाही उच्च रक्तदाबाची समस्या होती. राज्याचे कोविड टास्कफोर्सचे सदस्य डॉ राहुल पंडित म्हणाले की सध्या लाट असल्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीये, कारण दररोजची संख्या कमी होत आहे. लोकांनी मास्क वापरणे बंद केल्याने कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ झाली.

मुंबईकरांनो काळजी घ्या, कोरोना रूग्णसंख्या वाढतेय

डॉ. प्रदिप आवटे यांनी सांगितले की, मुंबईतील आणखी पाच रुग्णांमध्ये नवीन Omicron BA.4 आणि BA.5 आढळले आहेत. राज्यातील सर्वाधिक कोरोना रूग्ण हे मुंबई शहरामध्येच आहेत. कोरोनाचा वाढता आकडा बघता, मुंबईकरांना काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना टाळण्यासाठी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळाच आणि घराबाहेर पडताना मास्क वापरणे देखील तितकेच महत्वाचे आहे. महाराष्ट्रात BA. 4 आणि BA.5 प्रकरणांची एकूण संख्या 54 वर गेली आहे. मुंबईत सर्वाधिक 33, त्यानंतर पुणे 15, नागपूर4 आणि ठाणे 2 आहेत. यासंदर्भात Indiatimes.com ने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.