MVA : राज्यातील हालचाली पाहता काहीही घडू शकतं, पण इंदापूरकराने… 5 वर्षे मीच तुमचा आमदार- दत्तात्रय भरणे

राज्यात अनेक प्रकारच्या हालचाली सुरू आहेत, त्यामुळे काहीही घडू शकते, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

MVA : राज्यातील हालचाली पाहता काहीही घडू शकतं, पण इंदापूरकराने... 5 वर्षे मीच तुमचा आमदार- दत्तात्रय भरणे
दत्तात्रय भरणे
राहुल ढवळे

| Edited By: आयेशा सय्यद

Jun 27, 2022 | 6:59 AM

इंदापूर, पुणे : राज्यात सध्या राजकीय उलथा-पालथीची चिन्ह असताना मविआ सरकारमधील राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी एक मोठं विधान केलं आहे. राज्यात अनेक प्रकारच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे काहीही घडू शकतं, असं दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत. त्यांच्या हस्ते इंदापूर (Indapur) शहरात विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं. इंदापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर याठिकाणी एक उद्घाटन करण्यात आलं. यावेळी या ठिकाणी घेण्यात आलेल्या छोटे खानी कार्यक्रमात बोलताना भरणे यांनी हे विधान केलं.

राज्यात अनेक प्रकारच्या हालचाली सुरू आहेत, त्यामुळे काहीही घडू शकते. दोन वर्षे कोरोनाचा काळ होता आता. त्यानंतर काही चांगली कामं करता येतील असं वाटलं होतं. मात्र आता काहीही घडू शकतं. सरकार राहिलं काय अन् नाही राहिलं काय शेवटी तुमच्या तालुक्याचा आमदार मीच आहे!, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर शहरात विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं. इंदापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर याठिकाणी एक उद्घाटन करण्यात आलं. यावेळी या ठिकाणी घेण्यात आलेल्या छोटे खानी कार्यक्रमात ते बोलत होते.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचे बंडखोर आमदारांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार टिकणार की पडणार याबद्दल सर्वांनाच कोडं पडलं आहे. रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलनं होत आहेत. तर दुसरीकडं बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ आंदोलन होत आहेत. अशा सगळ्या राजकीय घडामोडी असताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत शंका व्यक्त केली आहे. राज्यात काहीही घडू शकतं. मात्र पाच वर्षे मीच आमदार आहे. आपण मंत्री असताना कधीच मोह केला नाही, कधीच रुबाब मिरवला नाही. मंत्री असताना प्रत्येक गावात वाडा वस्त्यात मी गेलो आहे, असं म्हणत भरणे यांनी म्हटलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें