Nilesh Rane: बाळासाहेबांचे नाव तुम्हीच वापरू नका; रस्त्यावर या मग बघा तुमचीच किंमत; ठाकरेंवर निलेश राणेंचा घणाघात

शिवसैनिकांना शिवसेना का सोडावी लागते यावर बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यासारख्या माणसांमुळे शिवसैनिकांना शिवसेना सोडावी लागते, त्यांच्यामुळेच आम्ही शिवसेना सोडली असंही त्यांनी सांगितले.

Nilesh Rane: बाळासाहेबांचे नाव तुम्हीच वापरू नका; रस्त्यावर या मग बघा तुमचीच किंमत; ठाकरेंवर निलेश राणेंचा घणाघात
उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसैनिक शिवसेना सोडत असल्याची निलेश राणेंनी केली टीका
Image Credit source: tv9 marathi
महादेव कांबळे

|

Jun 27, 2022 | 1:07 AM

मुंबईः राज्यातील अस्थिर झालेल्या राजकीय परिस्थितीवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असतानाच भाजपच्या निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांच्याकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काल शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना बंडखोर आमदारांवर टीका करताना बाळासाहेब ठाकरांचे (Balasaheb Thackeray) नाव न घेता निवडणुकीत उतारा असे आव्हा उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

त्यावर निलेश राणे म्हणाले की, तुम्हीच एकदा बाळासाहेबांचे नाव वापरू नका आणि रस्त्यावर या मग बघा तुमची किंमत अशी कडाडून टीका निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

शिवसैनिकांना शिवसेना का सोडावी लागते

यावेळी शिवसैनिकांना शिवसेना का सोडावी लागते यावर बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यासारख्या माणसांमुळे शिवसैनिकांना शिवसेना सोडावी लागते, त्यांच्यामुळेच आम्ही शिवसेना सोडली असंही त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंचे स्व-कतृत्व शून्य

आदित्य ठाकरे नशिबानं झालेले नेते आहेत. त्यांचे कुठलं आलं आहे स्व-कतृत्व, त्यांचे कतृत्व शून्य आहे अशी टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवरही केली आहे. आदित्य ठाकरे नशिबाने आमदार आणि मंत्री झाले असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या कतृत्वावर आणि नेतेपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री ही कधी कुठे रस्त्यावर उतरले आहेत, किंवा त्यांनी कुठे कसले आंदोलन केले आहे असा सवालही मुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी उपस्थित केला.

कशाला एवढ्या उड्या मारता

मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या कतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यातील सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारले आहे. तुमच्यामुळेच ते गुवाहटीला गेले असल्याच सांगत कतृत्व शून्य असताना तुम्ही कशाला एवढ्या उड्या मारता असा खोचक सवालही निलेश राणे यांनी उपस्थित केला.

स्वकुशीने कोणी पक्ष सोडत नाही

भाजपच्या निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी सडकून टीका केली. यावेळी ते म्हणाले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीला मुख्यमंत्री स्वतः जबाबादार असून त्यांनी आपली चूक मान्य करावी आणि जमिनीवर यावे. जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत. ते स्व-कुशीने गेले नाहीत, कुणी स्वकुशीने कुणीही पक्ष सोडत नाही. तर उद्धव ठाकरे यांच्यासारख्या लोकांमुळे शिवसेना सोडून शिवसैनिक इतर पक्षात जात आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे आपल्याच पक्षातील लोकांना भेटत नाहीत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें