अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान

| Updated on: Jul 22, 2021 | 5:30 PM

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात काम करणाऱ्या कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेश कार्यालयात करण्यात आला.

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात काम करणाऱ्या कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेश कार्यालयात करण्यात आला. यावेळी डॉ. प्रविण बांगर – केईएम रुग्णालयच यांचा सन्मान करण्यात आला. मनपातील दुय्यम अभियंता (ए वॉर्ड) अरुण वैद्य, आरोग्य सेवेतील रुग्णवाहिका चालक विठ्ठल बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व विघ्नहर प्रतिष्ठानचे महेश पानसरे यांचा सन्मान करण्यात आला. (Covid warriors honored at NCP office on occasion of Ajit Pawar’s birthday)

अजित पवार यांना भेटण्यासाठी येणाऱ्या गर्दीतला वेगळा माणूस बाजूला काढून त्याला विचारले तर तो सांगतो आमच्या हक्काचे ठिकाण म्हणजे अजित पवार, हीच खरी दादांची ताकद आहे, असे उद्गार माजी आमदार हेमंत टकले यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना काढले.

अजित पवार यांची कमिटमेंट ही माणुसकीची असते. सत्ता हे साधन आहे, मला सत्ताधीश व्हायचं नाही तर साधनधीश व्हायचं आहे, हे दादांचं काम आहे, असेही हेमंत टकले यांनी सांगितले. शिवाय ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेची माहितीदेखील दिली.

यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर मनपातील राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, सुधीर भोंगळे, सत्कारमूर्ती डॉ. प्रवीण बांगर यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आणि माजी आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सरचिटणीस बबन कनावजे, मनपातील राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे, दादांचे विशेष कार्यकारी अधिकारी अनिल डिकले, चिटणीस संजय बोरगे, चिटणीस प्रविण खरात, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष विजय वाडकर आदी उपस्थित होते.

‘राष्ट्रवादी जीवलग’ योजनेचा आजपासून शुभारंभ

अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांनी 450 अनाथ मुलांशी संवाद साधत केला. अजित पवारांना वाढदिवसाचे हे अनोखे गिफ्ट होते.

काल दिल्लीतून खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेची घोषणा करताना अजितदादा पवार यांच्या आजच्या वाढदिवशी शुभारंभ करण्याचे जाहीर केले होते. आज सकाळी झूमद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील 450 अनाथ मुलांशी व त्यांच्या नातेवाईकांशी राष्ट्रवादी दूतांसह संवाद साधला. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून काही वर्षे हे नातं घनिष्ट होणार असून 450 कुटुंबाचा एक गोतावळा निर्माण झाला पाहिजे हा या कार्यक्रमाचा भाग असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

इतर बातम्या

एकाच दिवशी शपथ, एकत्रच राजीनामा, एकाच दिवशी वाढदिवस, फडणवीस-अजितदादांचा योगायोग

ठाण्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने शैक्षणिक खर्च उचलला

‘राष्ट्रवादी जीवलग’ योजनेचा आजपासून शुभारंभ, अजितदादांना वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट

(Covid warriors honored at NCP office on occasion of Ajit Pawar’s birthday)