एकाच दिवशी शपथ, एकत्रच राजीनामा, एकाच दिवशी वाढदिवस, फडणवीस-अजितदादांचा योगायोग

महाराष्ट्राच्या राजकारणात हा 'पहाटेचा शपथविधी' म्हणून ओळखला जातो. देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मात्र शपथविधीची वेळ निवडली होती पहाटेची.

एकाच दिवशी शपथ, एकत्रच राजीनामा, एकाच दिवशी वाढदिवस, फडणवीस-अजितदादांचा योगायोग
अजित पवार-देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 2:09 PM

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांचाही आज (22 जुलै) वाढदिवस. फडणवीसांनी वयाची 51 वर्ष पूर्ण केली, तर अजितदादांनी 62. महाराष्ट्राच्या संसदीय राजकारणात महत्त्वाची पदं भूषवणाऱ्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक वेगळाच योगायोग पाहायला मिळाला होता. दोन वेगवेगळ्या पक्षात असलेल्या या नेत्यांनी एकाच दिवशी शपथ घेतली होती, तर एकाच दिवशी राजीनामाही दिला होता.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी झाला, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 या दिवशी. दोघांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी शपथ घेतली होती, तर 26 नोव्हेंबर 2019 रोजी दोघांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला होता.

नेमकं काय घडलं?

महाराष्ट्राच्या राजकारणात हा ‘पहाटेचा शपथविधी’ म्हणून ओळखला जातो. देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मात्र शपथविधीची वेळ निवडली होती पहाटेची. मुख्यमंत्रिपदावरुन शब्द फिरवल्याचा दावा करत शिवसेनेने भाजपशी युती तोडली आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेची बोलणी सुरु केली. या हालचाली सुरु असतानाच अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांच्या साथीने भाजपने सरकार स्थापन केलं.

अवघ्या तीन दिवसात फडणवीसांवर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली होती. याचं कारण म्हणजे अजित पवार यांनी पक्षाची हाक ऐकत मागे फिरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने फडणवीसांचं सरकार औट घटकेचं ठरलं होतं. त्यामुळे बहुमत चाचणीत पराभव टाळण्यासाठी फडणवीस यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता.

devendra fadnavis ajit pawar oath 7

अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना 23 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला.

दरम्यान, अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीतर्फे कोविड योद्ध्यांच्या सन्मान कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तर देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपनेही काही कार्यक्रम आयोजित केले आहेत.

संबंधित बातम्या :

चारित्र्य संपन्न, स्वच्छ प्रतिमा, मराठ्यांचा कैवारी; फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त संजय काकडेंची फेसबुक पोस्ट

“दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” अजितदादांनी रुसवा धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा जाहीर माफीनामा

(Ajit Pawar Devendra Fadnavis share birthday on same day 22nd July has more coincidences)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.