रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी आता एक वर्षांची मुदत; शिंदेंच्या मंत्र्यांचा निर्णय फडणवीसांनी फिरवला, सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदत देण्यात आली आहे. आधी 15 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन होती, त्यानंतर ही डेडलाईन वाढवण्यात आली आहे.

रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी आता एक वर्षांची मुदत; शिंदेंच्या मंत्र्यांचा निर्णय फडणवीसांनी फिरवला, सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया
pratap sarnaik
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 27, 2026 | 6:21 PM

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदत देण्यात आली आहे. आधी 15 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन होती, त्यानंतर मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईला देखील सुरुवात झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदत देण्यात आली आहे, यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले सरनाईक?

Loading...

एक मे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्यदीनापर्यत आपण वेळ दिली होती. परंतू मुख्यमंत्री सर्वोच्च नेते आहेत त्यांनी जो निर्णय घेतला त्यानुसार कारवाई होईल. मुदतवाढ दिली म्हणजे सर्वकाही झालं असं नाही. शासननिर्णयानुसार त्यांनी मराठी येणं आवश्यक आहे. कोकण मराठी साहित्य परिषद इतर संस्थाच्या मार्फत आम्ही मराठी शिकवण्याचे काम करू. 1800 शिक्षक आणि वर्ग सुरु ठेवू,  मुख्यमंत्री यांनी दिलेला निर्णय बंधनकारक असेल,  महाराष्ट्रात टॅक्सी रिक्षा चालवायची असेल तर मराठी येणं गरजेचं आहे, असं यावेळी प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्यासोबत बोलणं झालं, मिटिंग झाली तेव्हा मला मुख्यमंत्री म्हणाले की आपल्याला यांना वेळ द्यावी लागेल. त्यामुळे आता एक वर्षानंतर जर कोणी कारणं देत असतील तर कारणं ऐकली जाणार नाही. तेव्हा मात्र बंधनकारकच असेल.एक वर्षानंतर जर कोणाला मुदतवाढ हवी असेल तर ती मुदतवाढ मिळणार नाही,  मराठीसाठी मुदतवाढ दिली आहे बाकीच्या कोणत्याही कारवाईसाठी मुदतवाढ नाही, अशी माहिती देखील यावेळी प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

रिक्षा चालकांना मोठा दिलासा

दरम्यान रिक्षा चालकांना आता मराठी भाषा शिकण्यासाठी मुदतवाढ मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मराठी भाषा येत नाही,  या कारणांमुळे होणाऱ्या कारवाईला वर्षभर तरी ब्रेक लागणार आहे. राज्यात परराज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांची संख्या मोठी आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us