विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
या टोळीने याआधीही अशाच प्रकारचे गुन्हे केले असण्याची दाट शक्यता आहे. या टोळीला ही कन्साईमेंट नेमकी कोणी दिली होती. येथे ते कोणाला सोने देणार होते याची तपासणी करण्याचे काम डीआरआयने सुरु केले आहे.

Gold Smuggling: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशलन विमानतळावरुन डीआरआयने सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा भंडाफोड केला आहे. या टोळीतील २४ महिलांना सुमारे ३८ कोटी रुपयांचे सोने तस्करीच्या मार्गाने आणताना पकडण्यात आले आहे.या सर्व महिलांनी सोने अशा जागी लपवले होतो ज्याची कोणी कल्पना करु शकत नाही. गुप्त माहितीच्या आधारे या महिलांची झडती घेतली त्यावेळी हे ३० किलोचे सोने पकडण्यात आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने केलेल्या कारवाईत महिलांना तस्करांवर कारवाई करण्यात आली. महसुल गुप्तचर संचालनालयाने ऑपरेशन धहाबू ब्लिट्झ राबवून ही कारवाई केली आहे. या कारवाईत या गटाकडून ३७.७४ कोटी रुपयांचे २९.३७ किलोचे सोने जप्त करण्यात आले. यात २५.१० किलोग्रॅमच्या सोन्याच्या लड्या आणि ४.२७ किलोग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या संदर्भात डीआरआयने गुरुवारी प्रसिद्धी पत्रक जारी करत केनियाच्या २४ महिलांना अटक केल्याचे सांगितले आहे.
कुठे – कुठे लपवले सोने ?
या महिलांना स्पेशल प्रशिक्षण देण्यात आले होते. यांनी त्यांच्या बुटात, कपड्यांच्या आत आणि शरीरात विशेष रुपाने तयार केलेल्या पाऊचमध्ये सोने लपवलेले होते. यामुळे या महिलांना याचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आल्याचे समजते. या संदर्भात डीआरआयचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
येथे पोस्ट पाहा –
महिलांना सोने लपवले आणि तपास अधिकाऱ्यांची दीशाभूल करण्याचे प्रशिक्षण दिले होते. यामुळे या टोळीने एक सुनियोजित कट रचून हे सोने तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता हे समजते अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली. या महिलांना कोर्टात सादर केले जाणार आहे. या टोळीच्या प्रमुखाच्या शोधासाठी पुढील तपास करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.