100 तासांपासून आयकरची कारवाई सुरुच, पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयात आयटीच्या चौथ्या दिवशी धाडी

| Updated on: Oct 10, 2021 | 9:56 AM

आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर सुरु असलेल्या धाडींचा चौथा दिवस सुरु आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या निर्मल भवन इथल्या सीड ट्री कार्यालयात 100 तासांपासून आयटीची रेड सुरूच असल्याची सुत्रांची माहिती आहे.

100 तासांपासून आयकरची कारवाई सुरुच, पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयात आयटीच्या चौथ्या दिवशी धाडी
पार्थ पवार यांचं मुंबईतील कार्यालय
Follow us on

मुंबई: आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर सुरु असलेल्या धाडींचा चौथा दिवस सुरु आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, नंदूरबार आणि मुंबईत आयकर विभागाच्या धाडी सुरु होत्या. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या निर्मल भवन इथल्या सीड ट्री कार्यालयात 100 तासांपासून आयटीची रेड सुरूच असल्याची सुत्रांची माहिती आहे.

आयटीकडून तयारीसह कारवाई

पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयात आयटीकडून सलग चौथ्या दिवशी कारवाई सुरु आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा कारवाईला सुरवात झाली आहे. पार्थ पवारांच्या कार्यालयात आयटी अधिकाऱ्यांचा मुक्काम वाढणार असल्याची शक्यता आहे.सहा ते सात अधिकारी अजूनही कारवाई करत असल्याची माहिती आहे.

अधिकारी तीन दिवसांपासून पवारांच्या कार्यालयात

आयकर विभागाचे सर्व कर्मचारी तयारीसह पार्थ पवारांच्या कार्यालयात दाखल झाल्याची माहिती आहे. आयटीच्या अधिकाऱ्यांनी काल फोल्डर आणि अतिरिक्त एनव्हलप मागवले होते. सात ते आठ अधिकाऱ्यांनी पार्थ पवार यांच्याऑफिसमध्ये तीन रात्री घालवल्या आहेत. अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या तसेच नातेवाईक यांच्या मुंबई, गोवा, सातारा, पुणे, बारामतीत झालेल्या व्यवहार मुंबईतील याच कार्यालयातून पार पडल्याचा संशय आयकर विभागाला असल्याची सूत्रांची माहिती आहे.

केंद्रानं पाठवलेले पाहुणे गेले की उत्तर देईन : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या कपन्यांवर आयकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरुच आहे. या सर्व प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ते मिश्किलपणे पाहुणे असे म्हणाले. तसेच ही चौकशी संपली की पूर्ण पुराव्यानिशी बोलतो, असे देखील अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांची आयकर विभागमार्फत सुरु असलेल्या चौकशीवर भाष्य केले. “आता सध्या चौकशी सुरु आहे. आयकर विभाग त्यांचं काम करणार आहे. सध्या काम सुरु आहे. हे काम जेव्हा संपेल तेव्हा मी या संदर्भात बोलेन. आजसुद्धा हे काम सुरु आहे. आयकर विभागाला कोणत्याही कंपनीवर रेड टाकण्याचा अधिकार आहे. यामध्ये काय योग्य आहे ? काय अयोग्य आहे ? कॅश सापडतात का ? याची ते चौकशी करतात. त्यांची चौकशी करुन ते जातील. मग मी यावर भाष्य करेल,” असे अजित पवार म्हणाले.

इतर बातम्या:

IT Raid 3rd Day | अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी

Ajit Pawar IT Raids : अजित पवार, पाहुणे, बहिणी आणि साखर कारखान्यांच्या व्यवहाराचं गौडबंगाल, नेमकं काय आहे? वाचा सविस्तर

IT department continue red at office of Parth Pawar on fourth day reported by sources