IT Raid 3rd Day | अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरु आहे. नंदुरबार-आयान मल्टिट्रेड कारखान्यावर छापेमारी सुरु आहे. डॉ. रजनी इंदुलकर यांच्याही घरी आयकरची छापेमारी सुरुये. आयकर विभागाच्या 12-15 जणांकडून छापेमारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरु आहे. नंदुरबार-आयान मल्टिट्रेड कारखान्यावर छापेमारी सुरु आहे. डॉ. रजनी इंदुलकर यांच्याही घरी आयकरची छापेमारी सुरुये. आयकर विभागाच्या 12-15 जणांकडून छापेमारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. अजित पवारांच्या 3 बहिणींबरोबरच, 4 साखर कारखान्यांतील कागदपत्रांची छाननी आयकर विभागाकडून केली जातेय. यात साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखाना, नंदुरबारमधला पुष्पदंतेश्वर साखर कारखाना, अहमदनगरमधला अंबालिका, तर पुण्यातील दौंड शुगर साखर कारखान्याचा समावेश आहे. आयकर विभागाची पहिली नजर अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावरच पडली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI