मेहबूब शेख प्रकरणात चित्रा वाघ यांना मोठा झटका; बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव; भाजपच्या बड्या नेत्यांची नावं

| Updated on: Jun 19, 2022 | 6:57 PM

मेहबूब शेख यांच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाल्यानंतर मेहबूब शेखच्या समर्थकांनी त्यांच्या गावात फटाके वाजवून जल्लोष केला आहे, तर दुसरीकडे या प्रकरणात आश्चर्यकारक कलाटणी घेणारी या तरुणीने मात्र अजूनही आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

मेहबूब शेख प्रकरणात चित्रा वाघ यांना मोठा झटका; बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव; भाजपच्या बड्या नेत्यांची नावं
कोण आहे सायली? जिचा मेहबूब शेख चित्रा वाघ यांची मैत्रीण असल्याचा दावा करतात, बलात्कार आरोप प्रकरणात नवे ट्विस्ट
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष मेहबूब शेख (Mehbub Sheikh) याच्यावरही बलात्काराचा गुन्हा (Crime of rape) दाखल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ झाला होता. मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. मेहबूब शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आलला होता असा घुमजाव बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने केला आहे. यामध्ये या तरुणीने चित्रा वाघ आणि सुरेश धस या भाजपच्या बड्या नेत्यांची नावे घेतली असल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (Nationalist Youth Congress) मेहबूब शेख काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत डोळ्यात पाणी आणून कळवळून सांगत होते की, माझे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत.

जबरदस्तीने आरोप करण्यास सांगितले

तर यावेळी मात्र मेहबूब शेख यांच्यावर ज्या युवतीने आरोप केले होते, ते आरोप त्या युवतीने आपल्याला जबरदस्तीने त्यांच्यावर आरोप करण्यास सांगितले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीने मेहबूब शेख यांच्या विरोधात संपूर्ण राज्यात आकांड-तांडव घातला होता, त्याचेवळी मेहबूब शेख यांची या पदावरून आणि पक्षातून हकालपट्टी करण्याचीसुद्धा मागणी करण्यात आली होती, तर मात्र आता हे प्रकरण भाजपचाच अंगलट आले असल्याचे दिसत आहे.

 नदीम शेख याच्यावरही बलात्काराचा गुन्हा

मेहबूब शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी तरुणी काल सायंकाळी पाच वाजता औरंगाबाद शहरातल्या जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानंतर तिने मेहबूब शेखवर गुन्हा दाखल करायला लावणाऱ्या नदीम शेख याच्यावरही बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्यावरही आपल्या तक्रारीतून आरोप करण्यात आले आहेत.

तक्रारीत चित्रा वाघ यांचे नाव

या तरुणीच्या तक्रारीनंतर नदीम शेख याच्यावरही बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तर चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्यावर मात्र गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र युवतीने दाखल केलेल्या तक्रारीत त्यांची नाव आल्यामुळे आता खळबळ उडाली आहे.

सुरेश धस यांचे पूर्णपणे मौन

याप्रकरणी भाजपचे नेते सुरेश धस यांनी पूर्णपणे मौन बाळगले असून चित्रा वाघ यांनी मात्र या प्रकरणात आपला काहीही दोष नसून कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बेछूट आरोप

चित्रा वाघ यांनी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार असल्याचं सांगत असल्या तरीही सध्या चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बेछूट आरोप करण्यात येत आहेत. चित्रा वाघ विलासपूर नावाच्या नवऱ्याची बायको आहे त्यांचा हा व्यवसायच आहे, त्यामुळे चित्रा वाघ यांच्याबाबतीत दूध का दूध पानी का पानी स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी व्यक्त केली आहे.

समर्थकांनी गावात फटाके फोडले

मेहबूब शेख यांच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाल्यानंतर मेहबूब शेखच्या समर्थकांनी त्यांच्या गावात फटाके वाजवून जल्लोष केला आहे, तर दुसरीकडे या प्रकरणात आश्चर्यकारक कलाटणी घेणारी या तरुणीने मात्र अजूनही आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

चित्रा वाघ काय निर्णय घेणार

याप्रकरणात मेहबूब शेख हे गुन्हेगार नव्हते असं वरकरणी सिद्ध जरी होत असलं तरीही संबंधित तरुणीने मेहबूब शेख वरती खोटा गुन्हा का दाखल केला आणि आता घुमजाव करत पुन्हा एकदा नदीम शेख याच्यावरही बलात्काराचा गुन्हा का दाखल केला आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसला तरीही चित्रा वाघ यांचे नाव येत असल्याने चित्रा वाघ या प्रकरणांकडे कसे पाहतात हेच आता येणाऱ्या काही दिवसात पाहावे लागणार आहे.