आता 24 तास मिळणार राशन? राज्यातील पहिलं धान्य एटीएम नाशिकमध्ये सुरू, कसं मिळणार धान्य?

Maharashtra First Automated Annapurti Grain ATM Nashik: धान्य काळाबाजाराला आळा घालण्यासाठी राज्यात एक क्रांतीकारक पाऊल टाकण्यात आले आहे. नाशिकमध्ये राज्यातील पहिले धान्य एटीएम सुरू करण्यात आले आहे. कसे करते हे एटीएम काम?

आता 24 तास मिळणार राशन? राज्यातील पहिलं धान्य एटीएम नाशिकमध्ये सुरू, कसं मिळणार धान्य?
राज्यातील पहिलं धान्य एटीएम नाशिकमध्ये सुरू, कसं मिळणार धान्य?
| Updated on: Oct 21, 2026 | 9:43 AM

Annapurti Grain ATM Nashik: गरीब आणि दुर्बल घटकातील नागरिकांसाठी मोफत शिधा देण्याची व्यवस्था सरकार करते. शिधापत्रिकाधारकांना आता त्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. नाशिक शहरात राज्यातील पहिले धान्य एटीएम सुरू झाले आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने हा उपक्रम राबवला आहे. लाभार्थ्यांना बँकेच्या एटीएमप्रमाणेच 24 तास अगदी सहज आणि पारदर्शकपणे राशनचे धान्य मिळणार आहे. त्यासाठी काय आहे प्रक्रिया? कसे करते हे एटीएम काम?

कसे करते धान्य एटीएम काम?

Loading...

नाशिकमधील पथदर्शी योजनेतंर्गत हे मशीन सुरू करण्यात आले आहे. हे मशीन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. या एटीएममधून गहू, तांदूळ आणि इतर धान्यथेट लाभार्थ्यांच्या पिशवीत जमा होते.

1. बायोमॅट्रिक पडताळणी: लाभार्थ्याला सर्वात अगोदर या मशीनवर आपला आधार क्रमांक टाकावा लागतो. त्याचा अंगठा लावून बायोमॅट्रिक पद्धतीने ओळख पटवली जाते.

2. मोजून धान्य : या योजनेत लाभार्थ्याला किती धान्य मंजूर आहे हे फीड असते. त्यामुळे त्याला स्वयंचलित पद्धतीने हे मशीन तोलून तितकेच धान्य देते. ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटात पूर्ण होते.

3. झटपट धान्य पिशवीत: या संपूर्ण प्रक्रियेला फारतर एक मिनिट लागतो. त्यात 25 ते 30 किलो धान्य हे मशीन वितरीत करते.

या एटीएमचा फायदा काय?

राशनमधील काळाबाजार हा काही नवीन नाही. बोगस लाभार्थ्यांच्या नावावर धान्य बाजारातून गायब होते आणि ते विक्री होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे अनेकदा आलेल्या आहेत. याप्रकरणी सेवा पुरवठादाराविरोधातही गुन्हे दाखल आहेत. धान्याचा काळाबाजार, वेळेवर स्वस्त धान्य दुकान न उघडणे अशाही अनेक तक्रारी दाखल आहेत. यामुळे सर्वसामान्यांची बेजारी होते. त्यावर आता हे एटीएम मशीन फायदेशीर ठरणार आहे.

डिजिटल सिस्टिममुळे धान्याची चोरी आणि काळाबाजाराला आळा बसेल

हे मशीन 24 तास उपलब्ध असेल. यामुळे कामगारांना केव्हाही या योजनेचा लाभ घेता येईल

पात्र लाभार्थ्यांपर्यंत 100 टक्के धान्य पोहचतं होईल

राज्यभरात लवकरच धान्य एटीएम

नाशिकमध्ये सरकारने हा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. यानंतर राज्यात अनेक ठिकाणी अन्न आणि नागरी पुरवठा विभाग धान्य एटीएम मशीन सुरू करणार आहे. ग्रामीण भागातही हे एटीएम मशीन सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अदिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने हे डिजिटल पाऊल टाकले आहे.

धान्य एटीएम ई-पॉस या प्रणालीशी जोडलेलं असल्याने वन नेशन वन रेशन कार्ड या व्यवस्थेतंर्गत लाभार्थ्यांना धान्य देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पण या केंद्रावर इतर जिल्ह्यांतील, इतर प्रदेशातील लाभार्थ्यांना धान्य देता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. त्याविषयीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us