विश्वजीत कदम यांच्या सासूची ईडी चौकशी, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Feb 03, 2021 | 1:10 AM

याप्रकरणी गौरी भोसले यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे.  (Minister Vishwajit Kadam Mother in law ED Inquiry)

विश्वजीत कदम यांच्या सासूची ईडी चौकशी, नेमकं प्रकरण काय?
विश्वजीत कदम
Follow us on

मुंबई : काँग्रेस नेते आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची सासू गौरी भोसले या ईडी चौकशीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. गौरी भोसले यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. परदेशात खरेदी केलेल्या मालमत्तेची विचारपूस करण्यासाठी गौरी भोसले यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. (Minister Vishwajit Kadam Mother in law ED Inquiry)

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गौरी भोसले यांच्या अकाऊंटमधून परदेशात अनेक मालमत्ता खरेदी करण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्या अकाऊंट काही पैसेही परदेशात पाठवण्यात आले होते. याप्रकरणी गौरी भोसले यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे.

गेल्यावर्षी 27 नोव्हेंबरला अविनाश भोसले यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी आणखी माहिती शोधण्यासाठी मुंबई, पुण्यासह 23 ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गौरी भोसले यांची मुलगी आणि विश्वजीत कदम यांची पत्नी स्वप्नाली कदम यांनाही याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र अद्याप याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

गौरी भोसले कोण आहेत? 

  • गौरी भोसले या काँग्रेस नेते आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सासू आहेत.
  • गौरी भोसले यांच्या पतीचे नाव अविनाश भोसले आहे.
  • अविनाश भोसले हा विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. (Minister Vishwajit Kadam Mother in law ED Inquiry)

कोण आहेत अविनाश भोसले?

  • अविनाश भोसले यांना ओळखणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते 80च्या दशकात रिक्षा चालवत होते.
  • त्यानंतर त्यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध आला आणि ते सरकारी कंत्राटदार बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
  • आज ते कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. पुण्यात त्यांना रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखले जाते.

बाणेरमध्ये व्हाईट हाऊस

  • पुण्याच्या बाणेर येथे भोसले यांचा पॅलेस आहे. व्हाईट हाऊस असं त्याचं नाव आहे.
  • सफेद रंगाच्या या पॅलेसचा लूक अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखाच आहे.

कन्येच्या लग्नाला सेलिब्रिटींची मांदियाळी

  • अविनाश भोसले यांची कन्या स्वप्नाली हिचा विवाह माजी मंत्री, दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्याबरोबर झाला होता.
  • पुण्यातील सर्वात रॉयल विवाह सोहळा म्हणून हा विवाह सोहळा ओळखला जातो.
  • या विवाहाला अभिनेता सलमान खान यांच्यासह तत्कालीन केंद्रीय मंत्रीही आले होते.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रातील मतदारांना आता मतत्रिकेचाही पर्याय?; पटोलेंनी दिल्या कायदा बनविण्याच्या सूचना

Mumbai night life : मुंबईत लवकरच पुन्हा नाईट लाईफ, आदित्य ठाकरेंची घोषणा