Mumbai night life : मुंबईत लवकरच पुन्हा नाईट लाईफ, आदित्य ठाकरेंची घोषणा

सचिन पाटील

|

Updated on: Feb 02, 2021 | 6:59 PM

Mumbai Night Life : मुंबईत गेल्या वर्षी 26 जानेवारी 2020 रोजी नाईट लाईफ सुरु झाली. मात्र त्यानंतर काही दिवसांनी लगेचच कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन झालं होतं.

Mumbai night life : मुंबईत लवकरच पुन्हा नाईट लाईफ, आदित्य ठाकरेंची घोषणा
Aaditya Thackeray
Follow us

मुंबई : “कोव्हिडनंतर लवकरच आम्ही पुन्हा एकदा नाईट लाईफ (Mumbai night life) सुरु करणार आहोत”, अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली. ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू केल्यानंतर हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत, अजूनपर्यत तरी कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नाईट लाईफ देखील लवकरच सुरू करू, असं आदित्य ठाकरे म्हणाले. (Mumbai night life restore again soon after covid said minister aaditya thackeray )

मुंबईत गेल्या वर्षी 26 जानेवारी 2020 रोजी नाईट लाईफ सुरु झाली. मात्र त्यानंतर काही दिवसांनी लगेचच कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन केल्याने नाईट लाईफ सुरु होताच बंद झालं. मात्र आता नाईट लाईफ सुरु करण्याच्या हालचाली आदित्य ठाकरे यांनी सुरु केल्या आहेत.

याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, “आता आपण रेस्टॉरंटला 1 पर्यंत सुरु करण्याची परवानगी दिली आहे. हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत, अजूनपर्यत तरी कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नाईट लाईफ देखील लवकरच सुरू करू”

मुंबई नाईट लाईफ

26 जानेवारी 2020 पासून मुंबईमध्ये बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर 24 तास खुले ठेवण्यात येत होते. हे सर्व त्यावेळी प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आले होते.

मुंबईत ‘नाईट लाईफ’ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भाजप शिवसेना युती सरकारच्या वेळी आदित्य ठाकरेंनी ही संकल्पना मांडली होती. त्यावेळी याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र आता महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर प्रायोगिक तत्वावर यावर निर्णय घेण्यात आला.

यामुळे आदित्य ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने हे पहिले पाऊल पडलं. या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स 24 तास सुरु राहू शकतात. ज्यांची इच्छा असेल ते 24 तास व्यवसाय करु शकतात, अशी आदित्य ठाकरे यांची संकल्पना आहे.

संबंधित बातम्या 

मुंबईत नाईट लाईफ, राज्यात शिवथाळी, प्रजासत्ताक दिनी 2 महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ  

मुंबई 24 तास, जीवाची मुंबई आता जेवायची, नाईट लाईफचे चार नियम

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI