AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : ईशान्य कोपऱ्यात ठेवा या 5 वस्तू, घरात कधीच वास्तुदोष तयार होणार नाही

घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा तिचा परिणाम हा कुटुंबप्रमुखासह घरातील सर्व सदस्यांवर होत असतो. यालाच आपण वास्तुदोष असं देखील म्हणतो. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण आज काही उपाय जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : ईशान्य कोपऱ्यात ठेवा या 5 वस्तू, घरात कधीच वास्तुदोष तयार होणार नाही
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 14, 2026 | 8:35 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार काही दिशा या अत्यंत शुभ असतात, त्यापैकीच एक दिशा म्हणजे ईशान्य दिशा आहे. ईशान्य दिशेला देवाचं निवासस्थान आहे, असं मानलं जातं. त्यामुळे ईशान्य दिशा ही सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असून, वास्तुशास्त्रात या दिशेला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जर ईशान्य दिशेला काही शुभ वस्तू ठेवल्या गेल्या तर या सकारात्मक ऊर्जेचा अपेक्षित परिणाम संपूर्ण घरावर होतो. चला तर मग आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या ईशान्य दिशेला ठेवणं शुभ मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार देवघर हे नेहमी ईशान्य दिशेलाच असावं. ईशान्य दिशा ही देवाचं निवासस्थान मानली जाते, त्यामुळे तुमचं देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तुळशीचं झाड – तुळस ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात तुळस असते, तिची नियमित पूजा होते, त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, सर्व प्रकारचे आर्थिक संकटं नष्ट होतात. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं झाडं हे जर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात असेल तर त्याचा आणखी सकारात्मक परिणाम तुमच्या घरावर होतो. घराचं सर्व प्रकारच्या वाईट शक्तिंपासून संरक्षण होतं.

पाण्यानं भरलेला कलश – वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये पाण्यानं भरलेल्या कलशाला अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. पाण्यानं भरलेला कलश हा सकारात्मक ऊर्जेचं प्रतिक मानला जातो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला आहे, तर अशावेळी तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला पाण्यानं भरलेला कलश ठेवू शकता, त्यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचा वास्तुदोष नष्ट होईल.

शंख – हिंदू धर्मशास्त्रामध्ये शंखाला खूप महत्त्व आहे. शंखाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. देवघरामध्ये शंख असलाच पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं, जर तुम्ही तुमच्या देवघरात ईशान्य दिशेला शंख ठेवलात तर तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

कुबेराचा फोटो – वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला कुबेराचा फोटो लावला पाहिजे, त्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष नष्ट होऊन, तुम्हाला कधीही पैशांची कमी भासत नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...