खुशखबर ! विरार येथे पंधरा डब्याच्या लोकलसाठी मोठी सुविधा, विरार-डहाणू चौपदरीकरणालाही येणार वेग

पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकातून पंधरा डब्याच्या लोकल चालवण्याचा फलाटाची रुंदी आणि लांबी चालवण्याचे काम पूर्ण झाले आहे. नव्या कामामुळे विरार येथील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

खुशखबर ! विरार येथे पंधरा डब्याच्या लोकलसाठी मोठी सुविधा, विरार-डहाणू चौपदरीकरणालाही येणार वेग
virar station upgrade works completed
| Updated on: Apr 05, 2026 | 8:16 PM

पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकात पंधरा डब्याच्या लोकलसाठी फलाटाची रुंदी आणि लांबी वाढवण्याचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पूर्ण केले आहे. या नव्या फलाटावरुन पंधरा डब्याच्या लोकलची ट्रायल रन आज घेण्यात आली. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने गेल्या चार महिन्याच्या काळात हे काम पूर्ण केले असून लवकरच हे काम पश्चिम रेल्वेच्या सुपूर्द करण्यात येणार आहे. या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकलची प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे.

विरार – डहाणू रोड या मार्गाच्या चौपदरी करणासाठी आणि विरार रेल्वे स्थानकातील क्षमता वाढवण्याचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हाती घेतले होते. या कामांना चार महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. यात कामात विरार रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3A आणि 4A यांची रुंदी आता 6.50 मीटरवरुन 10.50 मीटर इतकी करण्यात आली आहे. तसेच पूर्वीच्या 12 डब्याच्या ऐवजी येथे आता 15 डब्याच्या लोकल चालवण्यासाठी फलाटाची लांबी देखील पंधरा डब्याच्या लोकल एवढी वाढवण्यात आली आहे. तसेच विरार स्थानकाच्या पश्चिमेला नवा होम प्लॅटफॉर्म 5A बांधण्यात आला आहे.

हे बांधकाम लोकलच्या वाहतूकीत कोणतेही निर्बंध न आणता रेकॉर्ड ब्रेक चार महिन्यात मुंबई विकास महामंडळाने पूर्ण केले आहे. आज पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने या नव्या फलाटावर लोकलची चाचणी देखील घेण्यात आल्याचे मुंबई विकास महामंडळाने म्हटले आहे. आता या फलाटावरुन 15 डब्याच्या लोकल चालवण्यासाठी लवकरच त्यांचा ताबा पश्चिम रेल्वेकडे देण्यात येणार असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विरार स्थानकातील प्रवासी क्षमता वाढवण्याचे काम हे या पश्चिम रेल्वे विभागाची क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. एमआरव्हीसी पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने अशी कामे सातत्याने राबवत आहे, ज्यामुळे सुरक्षितता वाढली जाऊन आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीत विनाव्यत्यय सुरळीत होण्यास मदत होत आहे असे एमआरव्हीसीचे सीएमडी विलास एस. वाडेकर यांनी म्हटले आहे.

 

 

Follow Us