सचिन वाझेंना निलंबित केलेलं 2004 मधील प्रकरण नेमकं काय, त्यावेळी काय झालं होतं, केस कुठवर आलीय?; निकाल काय लागला?

| Updated on: Mar 13, 2021 | 2:23 PM

सचिन वाझे यांना पोलीस आयुक्तांनी हे स्टेट्स काढून टाकण्याच्या सूचनाही दिल्याचं समजतं. मात्र, या निमित्ताने 2004च्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. (Sachin Vaze Has Also Been Accused Of Khwaja Yunus Custodial Death Case )

सचिन वाझेंना निलंबित केलेलं 2004 मधील प्रकरण नेमकं काय, त्यावेळी काय झालं होतं, केस कुठवर आलीय?; निकाल काय लागला?
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे
Follow us on

मुंबई: “2004मध्ये मला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं. तसंच काहीसं आता होत आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होत असून आता जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ आली आहे”, असं व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी खळबळ उडवून दिली आहे. वाझे यांना पोलीस आयुक्तांनी हे स्टेट्स काढून टाकण्याच्या सूचनाही दिल्याचं समजतं. मात्र, या निमित्ताने 2004च्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय होतं हे प्रकरणं? त्यामुळे वाझे एव्हढे फ्रस्टेड का आहेत? या सर्वांवर टाकलेला हा दृष्टीक्षेप. (Sachin Vaze Has Also Been Accused Of Khwaja Yunus Custodial Death Case )

काय आहे प्रकरण?

2 डिसेंबर 2002मध्ये घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्ब स्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता तर 39 लोक जखमी झाले होते. या प्रकरणी ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. 27 वर्षीय ख्वाजा युनूस हा परभणीचा रहिवासी होता. तो व्यवसायाने इंजीनियर होता. दुबईत काम करत होता. त्याला पोटाही लावण्यात आला होता. 6 जानेवारी 2003 मध्ये युनूसची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. युनूसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबादला नेण्यात येत होते. त्यावेळी तो फरार झाल्याचा पोलिसांनी दावा केला होता.

निकाल काय लागला?

कोर्टाने युनूस प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात युनूसचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचं उघड झालं होतं. युनूसला तुरुंगात कपडे काढून पट्ट्यांनी मारहाण केल्याचं एका साक्षीदाराने कोर्टाला सांगितलं होतं. या प्रकरणी एकूण 14 पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवलं होतं. मात्र, खटला केवळ चार पोलीस अधिकाऱ्यांवर चालवण्यात आला होता. त्यात वाझेसह तीन कॉन्स्टेबलचा समावेश होता. या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. दरम्यान, 2018 नंतर या प्रकरणावर कोर्टात कोणतीही सुनावणी झाली नाही.

खाकी सोडून खादीकडे

निलंबनानंतर तब्बल चार वर्षानंतर वाझे यांनी 2008 च्या दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, शिवसेनेत ते फारसे सक्रिय दिसले नाही. केवळ राजकीय कवच असावं म्हणून वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता, असं त्यावेळी बोललं जात होतं. त्यानंतर 16 वर्षानंतर म्हणजे 2020मध्ये त्यांचे पोलीस दलात पुनरागमन झालं होतं.

60 एन्काऊंटर

एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून वाझे यांचा पोलीस दलात दरारा होता. त्यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं आहे. वाझे यांच्या नावावर 60 एन्काऊंटर आहेत. कुप्रसिद्ध गुंड मुन्ना नेपाळी यांचा एन्काऊंटरही वाझेंनीच केला होता. त्यानंतर ते अधिक चर्चेत आले होते.

अॅक्शमोडमध्ये

तब्बल 20 वर्षानंतर पोलीस दलात आलेले वाझे लगेचच अॅक्शनमोडमध्ये आले होते. त्यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी पत्रकार अर्णव गोस्वामींना अटक केली होती. त्यावेळी मला अटक करण्यासाठी एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकारी का पाठवला असा सवाल अर्णव यांनी केला होता. (Sachin Vaze Has Also Been Accused Of Khwaja Yunus Custodial Death Case )

लेखक वाझे

वाझे हे केवळ एन्काउंटर स्पेशालिस्टच नाहीत तर ते टेक्नो सॅव्ही अधिकारी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. ‘जिंकून हरलेली लढाई’, द स्कॉट, शीना बोरा: द मर्डर दँट शुक इंडिया आदी पुस्तकांचे ते लेखक आहेत. (Sachin Vaze Has Also Been Accused Of Khwaja Yunus Custodial Death Case )

 

संबंधित बातम्या:

आता संयम नाही, जगाला गुड बाय करण्याची वेळ आली, सचिन वाझे यांचं धक्कादायक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस

फडणवीसांनी अधिवेशन गाजवल्याच्या चर्चा मात्र राऊत म्हणतात, ‘विरोधी पक्ष काय करतोय?’

सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, त्यांच्यासाठी अ‍ॅड. उद्धव ठाकरे आहेत, फडणवीसांचा जोरदार पलटवार

अर्णवला बेड्या ठोकल्या म्हणून सचिन वाझेला लटकवताय का? उद्धव ठाकरे आक्रमक

(Sachin Vaze Has Also Been Accused Of Khwaja Yunus Custodial Death Case )