सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, त्यांच्यासाठी अ‍ॅड. उद्धव ठाकरे आहेत, फडणवीसांचा जोरदार पलटवार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पटलवार केलाय. सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही. त्यांच्यासाठी अ‍ॅड. उद्धव ठाकरे आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, त्यांच्यासाठी अ‍ॅड. उद्धव ठाकरे आहेत, फडणवीसांचा जोरदार पलटवार
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 7:54 PM

मुंबई :सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्रं तयार केलं जात आहे. ते कशासाठी?’ असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पटलवार केलाय. सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही. त्यांच्यासाठी अ‍ॅड. उद्धव ठाकरे आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपलं. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर शरसंधान साधलं.(Devendra Fadnavis responds to CM Uddhav Thackeray’s remarks on Sachin Waze case)

फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. पक्षपातीपणे का बघताय? सचिन वाझेला का लटकवताय? एकाला बेड्या टाकून आरोपी किंवा संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून?”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अर्णव गोस्वामींचं नाव न घेता फडवीसांवर टीका केलीय. त्याला उत्तर देताना फडणवीसांनीही मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. मला आज आश्चर्य वाटलं. सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही. त्यांच्यासाठी अ‍ॅड. उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना आता दुसऱ्या वकिलाची गरज भासेल असं मला वाटत नाही. ज्या व्यक्तीविरोधात एवढे पुरावे आहेत. अशा व्यक्तीला मुख्यमंत्री डिफेंड करत होते.

मला हे समजत नाही की, एवढी त्या माणसाकडे काय माहिती आहे? त्या माणसाचा एवढा काय फायदा आहे? की त्याच्याविरोधात एवढे पुरावे असतानाही त्याला डिफेंड करण्याचं काम मुख्यमंत्र्यांना करावं लागतं. आम्हालाही माहिती आहे की, तो ओसामा बिन लादेन नाही. पण मुख्यमंत्र्यांचे अशाप्रकारचे निर्णय तुघलकी असल्याचा हल्लाबोल फडणवीसांनी केलाय.

सचिन वाझे प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?

मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा, अशी तपासाची पद्धत नसते. कुणी तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या सुरू आहे, असं सांगतानाच सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्रं तयार केलं जात आहे. ते कशासाठी?, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला आहे.

इतकंच नाही तर “सचिन वाझे पूर्वी शिवसेनेत होते. २००८ ला होते. त्यानंतर त्यांनी सदस्यत्व रिन्यू केलेलं नाही. त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही. हिरेन प्रकरण लावून धरलं, ते धरायलाच हवं. मात्र डेलकर प्रकरणात तर भाजपचा मंत्री आहे. सचिन वाझे तर मंत्री नाही. पक्षपातीपणे का बघताय? सचिन वाझेला का लटकवताय? एकाला बेड्या टाकून आरोपी किंवा संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून?”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अर्णव गोस्वामींचं नाव न घेता फडवीसांवर टीका केलीय. दरम्यान, अन्वय नाईक प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सचिन वाझे होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना हा सवाल केला आहे.

संबंधित बातम्या :

सचिन वाझे म्हणजे लादेन नाही, दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवई करणार; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले

अर्णवला बेड्या ठोकल्या म्हणून सचिन वाझेला लटकवताय का? उद्धव ठाकरे आक्रमक

Devendra Fadnavis responds to CM Uddhav Thackeray’s remarks on Sachin Waze case

'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.