Mumbai Local Train: फक्त 5 रुपये तिकीट पण तुम्ही फर्स्ट क्लासनं प्रवास करू शकता! मुंबईत धावते ही एकमेव ट्रेन, Video Viral
Mumbai Local Train Video: मुंबईच्या रुळावर धावतेय एकमेव लोकल ज्याचे तिकीट हे सेकंड क्लास सारखे आहे पण सुविधा या फर्स्ट क्लासच्या तिकीटसारखे आहेत.

Mumbai Local Train Ticket Fare: मुंबई लोकलमध्ये भयंकर गर्दी असते, हे काही आता नवीन नाही. लोक रोज आपली नेहमीची लोकल पकडण्यासाठी धावपळ करत असतात. नेहमीची लोकल चुकली ती सगळंच गणित फिस्कटत त्यात तुडुंब गर्दी असते. या गर्दीतून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रवासी फर्स्ट क्लासमधून प्रवास करतात. फर्स्ट क्लासचं तिकीट हे तुलनेने महाग असते, सेकंड क्लासच्या तुलनेत फर्स्ट क्लासमध्ये गर्दी थोडी कमी असते. त्यामुळे थोडे जास्त पैसे खर्च करून आरामात प्रवास करण्याला प्रवासी प्राधान्य देतात.
तुम्हाला एक अशी गोष्ट माहित आहे का ज्यात फर्स्ट क्लासच्या सगळ्या सुविधा आहेत पण तिकीट मात्र स्वस्त आहे. मुंबईच्या रेल्वे रुळांवर अशीही एक लोकल धावते, जिच्या सेकंड क्लासच्या डब्यात चक्क फर्स्ट क्लाससारख्या गादीच्या सीट्स आहे. या लोकलमध्ये तुम्ही सेकंड क्लासचं तिकीट काढूनही गादीच्या सीटवर बसून आरामात प्रवास करू शकता. ऐकून विश्वास बसन नसेल पण याचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.
ही विशेष लोकल मुंबईतील हार्बर मार्गावर धावते. या लोकलमध्ये 2133C सामान कक्षाच्या पुढे 1020 B क्रमांकाचा डब्बा आहे. विशेष म्हणजे, या कोचमध्ये चक्क फर्स्ट क्लाससारखे सुविधा पाहायला मिळतं. हा डबा सेकंड क्लासचा असला, तरी त्यामध्ये गादीच्या सीट्स लावण्यात आल्या आहेत. वास्तविक, मुंबई लोकलच्या सेकंड क्लासच्या डब्यांमध्ये लोखंडी पत्र्याच्या सीट्स असतात.
मात्र, या लोकलमधील एका डब्याची रचना इतर डब्यांपेक्षा अर्थात वेगळी आहे. त्यामुळे सेकंड क्लासचे तिकीट काढूनही प्रवाशांना गादीच्या सीटवर बसून प्रवास करता येतो. विशेष म्हणजे, संपूर्ण मुंबई लोकलमध्ये असा डबा असलेली ही एकमेव गाडी असल्याचे म्हटले जात आहे. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ किंवा २ वरून सुटते आणि पनवेल हे शेवटच्या स्थानकावर थांबते. या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सेकंड क्लासच्या तिकिटात गादीच्या सीटवर बसून आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येतो.