Shrikant Shinde : लवकरच फटाके फोडू, खासदार श्रीकांत शिंदे यांचं सूचक विधान; शिवसेनेतच असल्याचंही ठामपणे सांगितलं

| Updated on: Jun 27, 2022 | 5:16 PM

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करताना श्रीकांत शिंदे म्हणाले, की आमदारांचे निलंबन 11 जुलैपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय कोर्टाने दिला. खरे तर आम्ही शिवसेना पक्षातच आहोत. आम्ही सर्व कार्यकर्ते शिवसेनेत आहोत.

Shrikant Shinde : लवकरच फटाके फोडू, खासदार श्रीकांत शिंदे यांचं सूचक विधान; शिवसेनेतच असल्याचंही ठामपणे सांगितलं
खा. श्रीकांत शिंदे
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई/ठाणे : आम्ही लवकरच फटाके फोड, असे सूचक विधान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केले आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे निलंबन 11 जुलैपर्यंत करता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने (Supreme court) दिला. या निर्णयाचे श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केले. आता या बंडखोर आमदारांना भाजपासोबत सत्ता स्थापन करायची आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांना विचारले असता, पुढे काय काय होते पाहात राहा, असे ते म्हणाले. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अभिनंदनही त्यांनी केले आहे. ही मोठी लढाई आहे. ते लढत असलेल्या लढाईत सोबत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. खासदार झाल्यापासून सर्व जबाबदारी मी घेतली आहे. खासदाराची जी कर्तव्ये आहेत, ती पार पाडण्याचा प्रयत्न केला, असे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.

‘पक्ष वाढवण्याचा केला प्रयत्न’

मी एक खासदार आहे. जनतेची कामे महत्त्वाची आहेत. खासदार झालो, तेव्हापासून मी जबाबदारी घेतली आहे. शिवसेन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्याला कसे मोठे करता येईल, कार्यकर्त्याचे काम कसे होईल, लोकांची कामे कशी होतील, हे पहिल्या दिवसापासून आम्ही पाळले. एकीकडे पक्षाचे आदेश पाळले नाहीत, म्हणून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस शिवसेनेने पाठवली आहे. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. या बंडखोर आमदारांचे निलंबन सध्या तरी (11 जुलैपर्यंत) पुढे ढकलण्यात आले आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

‘आम्ही पक्षातच’

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करताना श्रीकांत शिंदे म्हणाले, की आमदारांचे निलंबन 11 जुलैपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय कोर्टाने दिला. खरे तर आम्ही शिवसेना पक्षातच आहोत. आम्ही सर्व कार्यकर्ते शिवसेनेत आहोत. आम्ही कधीही म्हटले नाही, की आम्ही पक्ष सोडला. दरम्यान, आता शिंदे गटाचे आमदार भाजपासोबत सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपाकडून मात्र यावर अद्यापतरी कोणतीही अधिकृत भूमिका आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

कोर्टाच्या निर्णयानंतर काय म्हणाले श्रीकांत शिंदे?