शिक्षणाचा ‘विनोद’ झाला, आता तरी न्यायाचा ‘वर्षा’व होईल का, मुंबईतील आंदोलनकर्त्या शिक्षकांचा सवाल

| Updated on: Mar 04, 2020 | 11:45 PM

आता न्याय मिळवल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला (Teacher protest at azad maidan) आहे.

शिक्षणाचा विनोद झाला, आता तरी न्यायाचा वर्षाव होईल का, मुंबईतील आंदोलनकर्त्या शिक्षकांचा सवाल
Follow us on

मुंबई : पगारासह इतर विविध मागण्यांसाठी अनुदानिक कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले (Teacher protest at azad maidan) आहेत. आज शिक्षक आंदोलनचा दुसरा दिवस आहे. पगार द्या अन्यथा इच्छा मरणाची अनुमती द्या अशी मागणी आंदोलनकर्त्या शिक्षकांनी केली आहे.

आझाद मैदानात मोठ्या (Teacher protest at azad maidan) संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे शिक्षक आंदोलनासाठी बसले आहेत. न्याय हक्कासाठी आझाद मैदानात धरणं आंदोलन करत आहेत. यातील अनेक शिक्षक आपल्या मुलाबाळांसह आंदोलनाला बसले आहेत.

पहिली पाच वर्षे आम्ही गप्प बसलो. पण याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा. एकूण 1 हजार 297 शिक्षक आहेत. सध्या 12 वीच्या परीक्षा सुरु आहेत. एका शिक्षकाला 250 उत्तरपत्रिका तपासाव्या लागत आहे. जर आम्ही इथे बसलो तर मुलांच्या उत्तरपत्रिका कोण तपासणार, त्याचा निकाल लांबेल. असे आंदोलनकर्ते शिक्षक म्हणाले.

शिक्षणाचा ‘विनोद’ झाला, ‘आशिष’ काही लाभला नाही, आता तरी न्यायाचा “वर्षा”व हेईल का? असा प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी उपस्थितीत केला आहे.

लेकरं-बाळांसह महिला शिक्षक आझाद मैदानावर, निवृत्ती आली तरीही पगार नाही, शिक्षक बाप ढसढसा रडला

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड स्वत: प्राध्यापिका आहेत. त्या अन्याय दूर करतील अशी आशा आंदोलनकर्ते उपस्थितीत करत आहेत.

दरवर्षी चौकशी करतो. पण काही हाती लागलं नाही. पद मिळाली नाही म्हणून पगारही नाही. पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षकांना उपोषणाची वेळ यावी. यापेक्षा खेदाची दुसरी गोष्ट नाही. त्यामुळे पगार द्या नाहीतर इच्छा मरणाची परवानगी द्या. अशी मागणीही अनेक शिक्षक करत आहे.

तर दुसरीकडे एका आंदोलनकर्त्या शिक्षिकेला आपबीती सांगताना एका आईला अश्रू अनावर झाले आहे. नवरा नाही, दोन मुलांपैकी एक अपंग आणि दुसरा लहान. मला 10 वर्षांपासून पगार नाही. मला आयुष्याची चीड येऊ लागली आहे. त्यांना जगवायचं की मरवायचं हा प्रश्न माझ्यापुढे आहे. शासनाने सांगावं मुलाला जगवू की मारुन टाकू असे एका शिक्षिकेने सांगितलं.

आम्ही बिनपगारी राबतोय. सरकारला आमची दया येत नाही. एक मजूरही काम करून रोजगर मागतो, आम्ही मागितलं तर त्यात गैर काय? असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी विचारले.

पिता म्हणून मला लाज वाटू लागली आहे. आमची मुलं आमच्यासोबत बाजारात येत नाही. आम्ही त्यांचे हट्ट पुरवू शकत नाहीत. काही मागितलं की त्यांना डोळे दाखवून वेळ मारावी लागते. एक बाप म्हणून आम्ही मुला-बाळांसाठी काही करू नये का? आत्महत्येचा विचार डोकावतो. रामाला १४ वर्ष वनवास होता. आम्ही 17 वर्ष भोगलं. पाच वर्ष सरकार तारीख पे तारीख देतयं, पण न्याय देत नाही. त्यामुळे आता न्याय मिळवल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला (Teacher protest at azad maidan) आहे.