लेकरं-बाळांसह महिला शिक्षक आझाद मैदानावर, निवृत्ती आली तरीही पगार नाही, शिक्षक बाप ढसढसा रडला

राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रस्तावित वाढीव पदांवर काम करणाऱ्या शिक्षकांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे.

लेकरं-बाळांसह महिला शिक्षक आझाद मैदानावर, निवृत्ती आली तरीही पगार नाही, शिक्षक बाप ढसढसा रडला
Follow us
| Updated on: Mar 03, 2020 | 2:21 PM

मुंबई : राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रस्तावित वाढीव पदांवर काम करणाऱ्या शिक्षकांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे (Teachers Protest on Azad Maidan). महाराष्ट्र अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वाढीव/प्रस्तावित पद कृती समितीच्या वतीने हे उपोषण करण्यात येत आहे. यात महिला शिक्षक आपली लहान लेकरं-बाळं घेऊन सहभागी झाल्या आहेत. यावेळी निवृत्त व्हायला अवघे 3 महिने शिल्लक असतानाही अद्याप पगार न मिळालेल्या शिक्षकाचा अश्रुंचा बांध फुटला आणि ते ढसाढढा रडले. या सर्व शिक्षकांनी सरकारकडे तात्काळ वाढीव जागांना मान्यता देण्याची मागणी केली आहे.

मागील अनेक वर्षांपासून मंत्रालयात एकच माहिती अनेक वेळा मागवली जात आहे. सर्व फाईल पूर्ण असूनही जाणून बुजून त्यात त्रुट्या काढत वाढीव पदांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप आंदोलरकर्त्या शिक्षकांनी केला आहे. यावेळी शिक्षकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मागील सरकारप्रमाणे या सरकारने देखील तोंडाला पाने पुसल्याचा आरोप केला.

आंदोलनकर्ते शिक्षक म्हणाले,

“12 ते 15 वर्षांपासून आम्ही अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात वाढीव पदांवर विनावेतन काम करत आहोत. हे शिक्षक विनावेतन हाल अपेष्टा सहन करत शिकवण्याचं काम करत आहेत. अनेक शिक्षकांच्या कुटुंबीयांना उपासमारीचे जीवन जगावे लागत आहे. मागच्या सरकारनेही आमची बोळवण केली आणि आता हे सरकार देखील तेच करत आहे. काही शिक्षकांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पैसे नाहीत. काही शिक्षक कॉलेजवर शिकवताना उदरनिर्वाहासाठी मजुरी करत आहेत. शिक्षकांना पगार मिळत नसल्यामुळे त्याचं लग्न जमत नाही.”

शिक्षक आमदार लक्षवेधी मांडून विधिमंडळाच्या अधिवेशनात वाढीव/प्रस्तावित पदांचा विषय वारंवार मांडतात. मात्र, तरी देखील हजारो शिक्षकांचा हा प्रश्न आजही प्रलंबितच राहिला आहे. मंत्रालयात आमची फाईल धूळ खात पडली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, असाही निश्चय आंदोलनकर्त्या शिक्षकांनी बोलून दाखवला. त्यामुळे आता सरकार वाढीव/प्रस्तावित पदांवर काम करणाऱ्या शिक्षकांना मान्यता आणि वेतन तरतूद करणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Teachers Protest on Azad Maidan

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.