Uddhav Thackeray : माझ्यानंतर जर मुख्यमंत्रीपद शिवसैनिकाला भेटणार असेल तर आता पायउतार होतो, उद्धव ठाकरेंचा मनमोकळा संवाद

| Updated on: Jun 22, 2022 | 6:36 PM

माझा शिवसैनिक संकटाला सामोरे जाणारा आहे. त्याने सांगावे, मी दोन्ही पदे सोडायला तयार आहे. पण मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंदाने मान्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : माझ्यानंतर जर मुख्यमंत्रीपद शिवसैनिकाला भेटणार असेल तर आता पायउतार होतो, उद्धव ठाकरेंचा मनमोकळा संवाद
जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे
Image Credit source: Facebook
Follow us on

मुंबई : ज्या शिवसैनिकांना असे वाटत असेल, की मी शिवसेनेचे नेतृत्व करायला नालायक आहे. तर मी ते पदही सोडायला तयार आहे. पण मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री (Shivsena CM) होत असेल तर मला आनंदाने मान्य आहे. त्याही पलिकडे जाऊन केवळ मी मुख्यमंत्री नको. दुसरा कोणी चालेल, तर तेही मला मान्य आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज प्रथमच समोर आले. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री पद त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी युती, हिंदुत्व अशा विविध विषयांवर त्यांनी आपले मत मांडले. मुख्यमंत्रीपदाचा (CM Post) मोह नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर आनंदच आहे, असे ते यावेळी म्हणाले.

‘इतरांना मी बांधील नाही’

मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना या वादावर ते म्हणाले, की ही बाळसाहेबांची शिवसेना राहिली नाही, असा आरोप केला जात आहे. त्याला माझ्याकडे उत्तर आहे. ज्या शिवसैनिकांना असे वाटत असेल मी शिवसेनेचं नेतृत्व तयार करायला नालायक आहे. तर मी ते पदही सोडायला तयार आहे. शिवसेनाप्रमुखपदही सोडाला तयार आहे. पण हे सांगणारा विरोधक नाही. तर असे फडतूस लोक खूप आहेत. त्यांच्या सांगण्यावरून ट्विटर ट्रोलिंगवरून सांगणारे आहेत. मात्र मी त्यांना बांधिल नाही. मी माझ्या शिवसैनिकांना बांधील आहे, असे त्यांनी सांगितले.

‘शिवसैनिक संकटाला सामोरे जाणारा’

पुढे ते म्हणाले, की माझा शिवसैनिक संकटाला सामोरे जाणारा आहे. त्याने सांगावे, मी दोन्ही पदे सोडायला तयार आहे. पण मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंदाने मान्य आहे. केवळ मी मुख्यमंत्री नको दुसरा कोणी चालेल, तर तेही मला मान्य आहे. मात्र मला समोर येऊन सांगावे. मी खूर्ची अडवून ठेवलीय नाही. तुम्ही या समोरून सांगा. फोनवरून सांगा. आम्हाला संकोच वाटतोय. पण तुम्ही म्हणालात, तसे आम्हाला तुम्ही नको असे सांगा. मी या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘काम हीच आयुष्याची कमाई’

पद येतात आणि जात असतात. आयुष्याची कमाई काय तुम्ही जे काही काम करता. त्यातून जनतेची जी प्रतिक्रिया असते ती खरी कमाई असते. मुख्यमंत्रीपद अनपेक्षितपणे आले. आता मी या पदाला चिपकून बसत नाही. तुम्ही सांगा मी पायउतार होतो, असे शिवसैनिकांना ते म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?