AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde vs Thackeray : आनंद दिघेंचे शागिर्द एकनाथ शिंदे ‘खऱ्या शिवसेनेचा’ नवा पक्षप्रमुख? सत्तेसोबत पक्षही ठाकरेंच्या हातून जाणार?

Eknath Shinde vs Thackeray Government LIVE : जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, असं संजय राऊतांनी म्हटलेलं होतं. त्यानंतर आता सत्ता गेली, तर सत्तेसोबतच पक्षही ठाकरेंच्या हातून निसटला जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

Eknath Shinde vs Thackeray : आनंद दिघेंचे शागिर्द एकनाथ शिंदे 'खऱ्या शिवसेनेचा' नवा पक्षप्रमुख? सत्तेसोबत पक्षही ठाकरेंच्या हातून जाणार?
भावनिक साद, त्याला भावनिक पत्रानं उत्तर, त्यावर एकनाथ शिंदे म्हणतात...ही आहे आमदारांची भावना...Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 23, 2022 | 10:30 AM
Share

मुंबई : आनंद दिघे (Anand Dighe) यांचे कट्टर समर्थक असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानं खळबळ माजली आहे. उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी थेट आव्हान दिलंय. आमदार आसाममध्ये सध्या बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे आहेत. आपल्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला होता. माझ्यासोबत असलेले शिवसेना आमदार हीच खरी शिवसेना आहे, असा दावा देखील त्यांनी केलाय. त्यामुळे नेमकं राजकीय घाडमोडींवर आता महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला जातोय. आनंद दिघे यांचा शागिर्द असलेल्या एकनाथ शिंदे हे खऱ्या शिवसेनेचे (Shivsena) नवे पक्षप्रमुख असणार की काय? अशी चर्चा आता रंगू लागलीय. अंतर्गत खदखद, हिंदुत्त्वाचा मुद्दा यासाठी शिंदेनी बंडखोरी केल्याची चर्चा रंगली आहे. त्यात जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, असं संजय राऊतांनी म्हटलेलं होतं. त्यानंतर आता सत्ता गेली, तर सत्तेसोबतच पक्षही ठाकरेंच्या हातून निसटला जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

आदित्यसोबत भांडण?

आदित्य ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्या खात्यातील वाढता हस्तक्षेत एकनाथ शिंदे यांना खुपू लागला होता. 2019 पासूनच याची चाहूल एकनाथ शिंदे यांना लागलेली होती. नगरविकास खांत एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं. वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन आदित्य ठाकरे यांच्याशी शिंदे यांचे मतभेद झाले होते. एमएमआरडीसीतही आदित्य यांना प्रोजेक्ट केलं जात होतं. अशातच उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या वेळी केलेल्या भाषणाने थेट एकनाथ शिंदे यांना संकेत दिलेले होते.

आता आपल्याकडे फार वेळ नाही राहिलेला याची जाणीव बहुधा एकनाथ शिंदे यांना झालेली असावी. त्यामुळे त्यांनी अखेर बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तवली जातेय. राज्यसभा निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बैठकीत ठेवला होता. पण हा प्रस्ताव संजय राऊत यांनी अमान्य केला होता, असंही सांगितलं जातंय.

सत्ता तर जाणार आणि पक्षही जाणार?

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता एकूण 34 आमदारांच्या सह्या असलेलं पत्र विधानसभा उपाध्यक्षांना पाठवण्यात आलं आहे. तसंच भरत गोगावले हे मुख्य प्रतोद असल्याचंही एकनाथ खडसेंनी म्हटल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याआधी काल सतरा आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचं पत्र विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आलं होतं. या पत्राद्वारे शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरुन हकालपट्टी करुन अजय चौधरी यांची नेमणूक केली होती.

यानंतर प्रचंड संतापलेल्या एकनाथ शिंदे यांनी अखेर आज 34 आमदारांच्या सहीचं पत्र दिल्याचंही आता समोर आलेलं होतं. एकनाथ शिंदे यांना पक्षांतर बंदी कायद्याला बायपास करायचं असेल, तर त्यांना 37 आमदारांची गरज आहेत. आपल्या 40हून अधिक आमदार असल्याचा शिंदे यांनी केल्यानं सेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. एकनाथ शिंदे यांनी अख्खी शिवसेना फोडली की शिवसेनेलाच टेक ओव्हर केलं, असा मुद्दाही आता उपस्थित होतोय. एकीकडे संख्याबळाची जुळवाजुळव आणि दुसरीकडे खऱ्या शिवसेनेचं पक्ष प्रमुखपद, अशा दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेच्या वाट्याला येतात की काय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सत्तेचं गणित कसं असेल?

बंडानंतर एकनाथ शिंदे गट मजबूत!

  1. एकनाथ शिंदे – 47
  2. भाजप – 106
  3. अपक्ष – 13
  4. एकूण – 166

बंडानंतरची महाविकास आघाडीची अवस्था

  1. शिवसेना – 14
  2. राष्ट्रवादी – 53
  3. काँग्रेस – 44
  4. अपक्ष – 10
  5. एकूण – 121
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.