माहीमच्या खाडीत 27 वर्षीय तरुणीने उडी मारली, मुंबई पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी, नेमकं काय घडलं?
मुंबईतील माहीमच्या खाडीत एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे संगमनेरमध्येही सारखीछ घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मुंबईतील माहीमच्या खाडीत एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणीचे वय 27 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. अद्याप तिची ओळख पटलेली नाही. मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात येणार आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना संशय आल्याने घटनास्थळी गर्दी झाली होती.
नेमकं घडलं काय?
मुंबईतील माहीमच्या खाडीमध्ये तरुणीने उडी मारली आहे. पोलिसांनी शोधकार्य सुरु केल्यानंतर पोलिसांना एक मृतदेह आढळून आला आहे पण अद्याप या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली नाही. त्याचंही काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. फॉरेन्सिक टीम त्याठिकाणी पोहोचली असून अधिकचा तपास सुरु करण्यात आला आहे. एका तरुणीचा मृतदेह सापडला असून या बॉडीचं शवविच्छेदन करण्यासाठी जवळच्या कूपर रुग्णालयात नेण्यात येणार आहे. या संबंधित मृत तरुणीचं वय २७ ते ३० दरम्यान, असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचं पथक आणि फॉरेन्सिट टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे.
मृतदेहाचा वास येत असल्याने नागरिकांना शंका आली. त्यानंतर मोठी गर्दी जमा झाली होती. रस्त्यावर लोक जमा झाल्यामुळे ट्रॅफिकची समस्याही उद्भवली. त्यामुळे आता नेमकी ही घटना का घडली, तरुणीने टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास झाल्यानंतर सर्व माहिती समोर येणार आहे.
संगमनेरमध्येही एकाची उडी
दरम्यान, अशीच एक घटना आता संगमनेर मधून समोर आली आहे. अहिल्यानगरमधील संगमनेरमध्ये बंधाऱ्यावरून एकाने घेतली उडी त्यानंतर त्याच्यासाठीही शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील सतीश आप्पासाहेब वाणी (वय 35 वर्ष) असे तरूणाचे नाव असून चणेगाव येथील प्रवरा नदीवर असलेल्या बंधा-यावरून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. काल सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान काही ग्रामस्थांनी बंधाऱ्यावरून एकाला उडी मारत असल्याचे बघितल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनाला कळवल्यानंतर आज सकाळपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तरूणाने कोणत्या कारणाहून नदीत उडी घेतली याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पण याचा तपास आता पोलिसांमार्फत सुरु करण्यात आला आहे.