प्यारे खान यांच्या उपस्थितीनंतर नागपुरातील गरबा मंडळाचे शुद्धीकरण; हनुमान चालिसाचेही पठण

नागपूर गरबा मंडळात अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या भेटीने वाद निर्माण झाला. विश्व हिंदू परिषदेने यावर आक्षेप घेत मंडपाचे गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केले आणि हनुमान चालीसा पठण केले. आयोजक रितेश गावंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यामुळे गरबा प्रवेशावरील चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

प्यारे खान यांच्या उपस्थितीनंतर नागपुरातील गरबा मंडळाचे शुद्धीकरण; हनुमान चालिसाचेही पठण
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Oct 19, 2026 | 6:42 PM

सध्या देशभरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होत असून महाराष्ट्रातही मोठा उत्साह दिसत आहे. राज्यातील विविध शहरांत नवरात्रोत्सवानिमित्त गरब्याचंही आयोजन करण्यात आलं आहे. यातच आता नागपूरच्या मनिष नगदर येथील गरबा मंडळ चर्चेत आलं आहे. नागपूर शहरातल्या मनीष नगरचं गरबा पंडाल आहे.भारतीय जनता पक्षाच नगरसेवक असलेले रितेश गावंडे यांच्या माध्यमातून हा भव्यदिव्य गरबा पंडाल साकारण्यात आलं. पण याच नगाडा गरबा मंडळात अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी उपस्थिती लावल्यानंतर नवा वाद निर्माण झाला. विश्व हिंदू परिषदेकडून प्यारे खान यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेण्यात आला आणि त्यानंतर गरबा मंडळाच्या परिसरात गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं. तसेच हनुमान चालिसाचे पठणही करण्यात आलं. या घटनेमुळे नागपुरातील गरबा मंडळांमधील प्रवेशावरून सुरू असलेल्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

गरबा मंडळांमध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेकडून मांडण्यात आली होती. मात्र अशी भूमिका असतानाही अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मनीष नगर येथील नगाडा गरबा मंडळाला भेट दिली. त्यांच्या या उपस्थितीनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले, त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गरबा मंडळाच्या परिसरात गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केले. त्यानंतर हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करण्यात आलं. यावेळी विश्व हिंदू परिषदेकडून गरबा मंडळाचे आयोजक आणि भाजपचे नगरसेवक रितेश गावंडे यांना वराह देवतेचं छायाचित्र भेट देण्यात आलं.

Loading...

रितेश गावंडे यांची भूमिकाही समोर

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामध्ये या नगाडा गरबा मंडळाचे आयोजक रितेश गावंडे यांची भूमिका समोर आली आहे. प्यारे खान गरबा मंडळात आले, त्यावेळी मी स्वतः तिथे उपस्थित नव्हतो, असं गावंडे यांनी स्पष्ट केलं. ते अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष असल्याने गरबा मंडळात आले होते, अशी माहिती गावंडे यांनी दिली.

तर दुसरीकडे, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेचे स्वागत करतानाच प्यारे खान यांच्याशी असलेल्या संबंधांबाबतही गावंडे यांनी भूमिका स्पष्ट केली. प्यारे खान हे आपल्या परिवारातील असून, ते अनेक वर्षांपासून भाजप परिवारात काम करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us