महिनाभरात विदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती द्या, नागपूर मनपाचं आवाहन

| Updated on: Dec 23, 2020 | 8:13 AM

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका, नाताळ आणि नववर्षानिमित्त होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर नागपुरातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

महिनाभरात विदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती द्या, नागपूर मनपाचं आवाहन
कोरोना चाचणी प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नागपूर: युनायटेड किंगडम अर्थात UK मध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर आता भारत आणि महाराष्ट्रात मोठी खबरदारी घेतली जात आहे. महिनाभरात विदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती द्या, असं आवाहन नागपूर महापालिकेकडून करण्यात आलं आहे. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, मिडल ईस्ट देश, युरोपमधून आलेल्या प्रवाशांची माहिती द्या, असं महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांनी सांगितलं आहे. कोरोना विषाणूच्या नवा प्रकाराचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. तसंच कोरोना नियंत्रणासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी विनंतीही आयुक्तांनी केली आहे. (NMC alert after new strain of corona virus)

नागपुरातही नाईट कर्फ्यू

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका, नाताळ आणि नववर्षानिमित्त होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर नागपुरातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासाठी नागपुरातील रस्त्यांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा उतरल्याचं पाहायला मिळालं. रात्री 11 ते सकाळी 6 या दरम्यान ही संचारबंदी लागू करण्यात आलीय. तसे आदेश नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी जारी केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूर महापालिकेकडून ही उपाययोजना केली जात आहे.

ऑक्सिजनची मागणी 50 टक्क्यांनी घटली

नागपूर जिल्ह्यातील ऑक्सिजची मागणी आता घटली आहे. सप्टेंबरमध्ये नागपूर जिल्ह्यात 60 टन ऑक्सिजन लागत होता. ती मागणी आता 30 टनांवर आली आहे. ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. नागपूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 4 हजार 57 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना विषाणूची नवीन प्रजाती आढळून आल्यानंतर ब्रिटन येथून आलेले तब्बल 20 जण कोरोना संक्रमित असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारत सरकारने युकेहून (UK) येणाऱ्या लोकांसाठी कठोर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये विमानतळावर प्रत्येकाची RT-PCR चाचणी करणे अनिवार्य असेल. निती आयोगचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल यांनी मंगळवारी सांगितलं, की याबाबत घाबरण्याची गरज नाही. पण आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.

भारताने 23-31 डिसेंबरपर्यंत ब्रिटन येथून येणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. ब्रिटन येथून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर पाळत ठेवली जाणार आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या 20 पॉझिटिव्ह लोकांमध्ये सोमवारी रात्री दिल्लीत लँड करणाऱ्या 6, रविवारी रात्री कोलकाता येथे येणाऱ्या 2, मंगळवारी अहमदाबाद येथे येणाऱ्या 4 आणि आज अमृतसरला आलेल्या एका क्रू मेंबरचा समावेश आहे. हे सर्व लोक एअर इंडियाच्या विमानाने लंडनहून भारतात आले होते.

संबंधित बातम्या:

Night curfew : कशी राहिली मुंबईतील रात्रीच्या संचारबंदीची पहिली रात्र?

New Corona Strain : ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांवर सरकारची नजर

NMC alert after new strain of corona virus