Night curfew : कशी राहिली मुंबईतील रात्रीच्या संचारबंदीची पहिली रात्र?

मुंबईमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशावेळी 4 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. मुंबई पोलिसांकडून दिंडोशी, कांदिवली, सिद्धिविनायक मंदिर, सीएसएमटी आणि हाजी अली परिसरात मोठी खबरदारी घेण्यात आली.

Night curfew : कशी राहिली मुंबईतील रात्रीच्या संचारबंदीची पहिली रात्र?

मुंबई: जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने आता आपलं रुप बदललं आहे. युनायटेड किंगडम अर्थात UK मध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकाराचा प्रसार अधिक वेगानं होत असल्याचं खुद्द ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यात नाताळ आणि नववर्षानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारनं रात्रीची संचारबंदी लावली आहे. मंगळवारपासून त्याची सुरुवात झाली. तर रात्रीच्या संचारबंदीची मुंबईतील पहिली रात्र कशी राहिली, ते आपण जाणून घेऊया.(How was the first night of night curfew in Mumbai?)

मुंबईमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशावेळी 4 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. मुंबई पोलिसांकडून दिंडोशी, कांदिवली, सिद्धिविनायक मंदिर, सीएसएमटी आणि हाजी अली परिसरात मोठी खबरदारी घेण्यात आली.

दिंडोशी :

झोन 12 चे डीसीपी डॉ. डी. स्वामी यांनी स्वत: दिंडोशी आणि कुरार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या टीमसोबत दिंडोशी, गोरेगाव आणि मालाड पूर्व परिसरात रात्री 11 वाजता पोलिस मार्च काढला. यावेळी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना अडवून त्यांची चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर रस्त्यावर दिसणाऱ्या लोकांना घरात जाण्याची विनंतीही पोलिस करत होते.

कांदिवली :

कांदिवली पोलिस रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या संचारबंदीबद्दल माहिती देताना पाहायला मिळाले. मेडिकल शिवाय एकही दुकान सुरु राहणार नाही. 4 पेक्षा जास्त लोक एकत्र दिसून आले तर त्यांच्यावर कलम 144 नुसार कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात येत होतं.

सिद्धिविनायक मंदिर :

सिद्धिविनायक मंदिर परिसरातही पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक गाडीवर पोलिसांची करडी नजर होती. मुंबई पोलिसांसह ट्राफिक पोलिसही रस्त्यावर दिसून येत होते.

हाजी अली :

हाजी अली परिसरात रस्त्यांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला. जुहू, बांद्रा, मरीन ड्राईव्ह या परिसरात रात्री 11 नंतर मोठी शांतता होती. पोलिस प्रत्येक गाडीची चौकशी करत होते आणि रात्रीच्या संचारबंदीबद्दल लोकांना समजावून सांगत होते.

सीएसएमटी :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेरील रस्त्यांवर रोज गाड्यांची मोठी रांग पाहायला मिळायची. सीएसएमटी स्टेशनवरील आकर्षक लाईटिंगचे फोटो आणि सेल्फी घेत असत. पण आज तिथे वेगळंच चित्र पाहायला मिळालं. या परिसरात आज मोठी शांतता होती. रस्त्यांवर मुंबई पोलिसांची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविना कुणीही दिसून येत नव्हतं.

संबंधित बातम्या:

ब्रिटन, महाराष्ट्र आणि एक नेगेटीव्ह असलेली मोठी पॉझिटीव्ह बातमी

Suresh Raina arrested : क्रिकेटपटू सुरेश रैना आणि सुझान खान यांची अटकेनंतर सुटका

Night Curfew: हॉटेल व्यावसायिकांनंतर व्यापारी आक्रमक, नाईट कर्फ्यूला विरोध

How was the first night of night curfew in Mumbai?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI