Nagpur Accident : नागपुरात अपघाताचा थरार, मॉर्निंग वॉक करणाऱ्यावर काळाचा घाला; पादचाऱ्याचा कारखाली चिरडून मृत्यू

नागपुरात भल्या पहाटे अपघाताचा थरार घडला. मॉर्निंग वॉक करताना काळाने घाला घातला. पादचाऱ्याचा कारखाली चिरडून मृत्यू झाला आहे.

Nagpur Accident : नागपुरात अपघाताचा थरार, मॉर्निंग वॉक करणाऱ्यावर काळाचा घाला; पादचाऱ्याचा कारखाली चिरडून मृत्यू
nagpur accident news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 7:31 AM

सुनील ढगे : नागपुरात रविवारी भल्या पहाटे भीषण अपघाताची घटना घडली आहे. नागपुरातील जपानी गार्डन रोडवर रविवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली . या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तीन कार भरधाव वेगात येत असताना एक कार गार्डनच्या भिंतीवर धडकली. त्यानंतर एका कारने रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन कार भरधाव वेगात होत्या. त्यातील एक कार गार्डनच्या भिंतीला धडकली. या कारने रस्त्यावर चालणार्‍या एका व्यक्तीला चिरडले. यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अपघातावेळी दोन कार भरधाव वेगात निघून गेल्या. मात्र एकीचा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. तर एक जण कारमध्ये अडकल्याचे दिसून आले. कारमधील लोकांनी मद्यपान केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिन्ही कारची शर्यत असण्याची श्यक्यता वर्तविली जात आहे. कैलास सनोडिया असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते ज्येष्ठ नागरिक आहेत.

भगेमाहिरी टोल नाक्याजवळ ट्रक पेटला

नागपुरात (Nagpur) ट्रकच्या केबिनमध्ये स्वयंपाक करताना अचानक आग लागल्याची घटना घडली. भगेमाहिरी टोल नाक्याजवळ ट्रक पेटल्याचे समोर आलं आहे. सावनेरच्या भगेमाहिरी टोल नाक्याजवळ ट्रकला भीषण आग लागली. शनिवारी रात्री सुमारे 11.30 वाजताचा सुमारास घटना घडली. टोल नाक्याजवळ ट्रक थांबवून केबिनमध्ये स्वयंपाक सुरू होता. त्याचवेळी अचानक आग लागून काही क्षणांतच केबिन आगीच्या भक्ष्यस्थानी झाली.

झारखंडहून भोपाळच्या दिशेने ट्रक जात होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. आगीत जीवितहानी झालेली नाही. परंतु ट्रकचे मोठं नुकसान झाले आहे. देशात दिवसेंदिवस वाहनांना आग लागण्याच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ट्रकमध्ये स्वयंपाक न करण्याचे आवाहन केले जात आहे.

Follow Us