Nagpur temperature | नागपुरात एप्रिलमध्ये उष्माघाताचे 13 बळी; मे महिन्यात राहणार सर्वाधिक तापमान

| Updated on: May 01, 2022 | 10:55 AM

नागपुरात एप्रिलमध्ये उष्माघाताने 13 जणांचे बळी घेतले. त्यामुळं नागरिक आतापासून चिंताग्रस्त झाले आहेत. मे महिन्यात विदर्भात सर्वाधिक तापमान असतो. अशावेळी या वाढत्या तापमानाचा सामना कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nagpur temperature | नागपुरात एप्रिलमध्ये उष्माघाताचे 13 बळी; मे महिन्यात राहणार सर्वाधिक तापमान
विदर्भात तापमानाचा पारा भडकला.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : विदर्भात सूर्याच्या (sun in Vidarbha) प्रकोपामुळं उष्णाघाताच्या रुग्णांत वाढ झाली आहे. नागपुरात गेल्या 13 दिवसांत 5 जणांचा उष्णाघातानं मृत्यू झालाय. 61 नव्या रुग्णांची भर (overcrowding) पडली. यंदा मे महिन्यात राहणारी उन्हाची तीव्रता एप्रिल ( April) महिन्यातच दिसून आली. त्यामुळं सर्वाधिक उष्ण असा मे महिना कसा जाणार, याची चिंता नागरिकांना वाटू लागली आहे. मे महिन्यात तापमान अधिकच वाढणार आहे. 2017 व 2018 मध्ये उष्माघाताचे रुग्ण आढळून येत होते. मात्र, उष्माघाताने मृत्यू होत नव्हते. यंदा तर एप्रिल महिन्यात 13 जणांचे मृत्यू उष्णाघातानं झाले आहेत. गेल्या 13 दिवसांत 9 जण उष्माघाताने गेलेत. त्यामुळं आता मे महिन्याची ऊन आणखी किती तापणार, यामुळं नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.

उन्हामुळं दुपारी रस्त्यावर अघोषित संचारबंदी

नागपूरसह संपूर्ण विदर्भावर सध्या सूर्यदेवतेचा कोप सुरू आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिक वाढत्या उन्हामुळे हैराण झाले आहेत. कडक उन्हात घामाच्या धारा वाहत आहेत. सकाळच्या वेळी रस्त्यावर वर्दळ दिसत असली तरी दुपारी मात्र रस्त्यावर अघोषित कर्फ्यु लागल्याचं चित्र पाहायला मिळते. रस्त्यावर शुकशुकाट असतो. डॉक्टरसुद्धा सल्ला देतात की महत्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नये. चंद्रपूरमध्ये 46 तर नागपुरात तापमानाने 45 चा पारा पार केला. रस्त्यावरील शितपेयाच्या दुकानात गर्दी वाढल्याचं चित्र पाहायला मिळते. नागपुरात वाढलेल्या उन्हामुळे नागरिकसुद्धा चिंता व्यक्त करत आहेत. नागपुरात एप्रिलमध्ये उष्माघाताने 13 जणांचे बळी घेतले. त्यामुळं नागरिक आतापासून चिंताग्रस्त झाले आहेत. मे महिन्यात विदर्भात सर्वाधिक तापमान असतो. अशावेळी या वाढत्या तापमानाचा सामना कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाशिममध्येही पारा भडकला

वाशिम जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरपासून उन्हाची तीव्रता जाणवण्यास सुरुवात झाली. मात्र, एप्रिल महिन्यात जिल्ह्याचा पारा 43 अंशांवर कायम राहिला. अशातच येत्या तीन दिवसांत तापमान कायम राहणार आहे. तीन तालुक्यांत पारा 44 अंशांच्या वर राहणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर व मानोरा या तीन तालुक्यात मंगळवारपर्यंत 44 अंशांवर पारा राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर वाशिम, रिसोड व मालेगाव या तालुक्यात 43 अंश पारा असणार आहे.

हे सुद्धा वाचा