Nitin Gadkari : नागपूर-बुटीबोरी मार्गावर 6 पदरी उड्डाणपूल, 19 किमीचे अंतर 15 मिनिटांत पार करता येणार, नितीन गडकरींनी घेतला आढावा

| Updated on: Jun 28, 2022 | 11:35 AM

नागपूर-बुटीबोरी पुलाला मिहानशी जोडलं जाणार आहे. पुलावरून जामठा स्टेडियमसाठीही लँडिंग देण्यात येईल. हा सहा पदरी पूल डबल डेकर असणार आहे. जामठा ते बुटीबोरी हे 12 किलोमीटरचे अंतरावरून मेट्रो धावेल. मेट्रो फेज-2 मध्ये बुटीबोरीपर्यंत विस्तार करण्यात येईल.

Nitin Gadkari : नागपूर-बुटीबोरी मार्गावर 6 पदरी उड्डाणपूल, 19 किमीचे अंतर 15 मिनिटांत पार करता येणार, नितीन गडकरींनी घेतला आढावा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Image Credit source: facebook
Follow us on

नागपूर : नागपूर-बुटीबोरी मार्गावर 6 पदरी उड्डाणपूल होणार आहे. हा उड्डाणपूल झाल्यास 19 किमीचे अंतर 15 मिनिटांत पार करता येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी यासंदर्भात आढावा घेतला. 19.683 किमीचा हा उड्डाणपूल असेल. नागपूर-बुटीबोरी हा अतिशय महत्वाचा मार्ग आणि औद्योगिक दृष्ट्या (Industrial) महत्वाचा मार्ग आहे. सहा पदरी मार्ग बनविण्या ऐवजी उड्डाणपूल बनविला जाणार आहे. हा शहरातील सर्वात लांब उड्डाणपूल ठरणार आहे. हा पूल बांधल्यानंतर चिंचभुवन ते बुटीबोरी हे अंतर 15 मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. नवीन उड्डाणपुलाजवळील चिंचभुवन (Chinchbhuvan) ते बुटीबोरी या 19.683 किमी लांबीचा प्रस्तावित आहे. या प्रस्तावित पुलाची किंमत 1 हजार 632 कोटी रुपये आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे भूसंपादनाची (Land Acquisition) गरज राहणार नाही.

जामठा ते बुटीबोरी मेट्रो धावणार

प्रस्तावित सहा पदरी रस्त्याच्या कामाला दिरंगाई होत आहे. यामुळे आता या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. लवकरच मेट्रो आणि एनएचएआयच्या सल्लागारांची बैठक होईल. त्यानंतर पुलाच्या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. खापरी ते बुटीबोरी हा महामार्ग सहा पदरी करण्याची घोषणा केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी यापूर्वीच केली होती. नागपूर-बुटीबोरी पुलाला मिहानशी जोडलं जाणार आहे. पुलावरून जामठा स्टेडियमसाठीही लँडिंग देण्यात येईल. हा सहा पदरी पूल डबल डेकर असणार आहे. जामठा ते बुटीबोरी हे 12 किलोमीटरचे अंतरावरून मेट्रो धावेल. मेट्रो फेज-2 मध्ये बुटीबोरीपर्यंत विस्तार करण्यात येईल.

मोकळ्या जागांचा व्यावसायिक विकास

नागपूर शहरालगत महामार्गाशेजारी काही मोकळ्या जागा आहेत. या जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात आहेत. या जागांवर शौचालय, लहान मुलांना दुग्धपान करण्यासाठी कक्ष, चार्जिंग स्टेशन, पेट्रोल पंप, निर्माण केले जावेत. असे निर्देश नितीन गडकरी यांनी दिलेत. दिघोरी चौक ते इंदोरा चौकापर्यंत नव्यानं होत असलेल्या उड्डाणपुलाचा आढावा नितीन गडकरी यांनी घेतला. कुठंही वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. अस्तित्वात असलेला उड्डाणपूल तोडून नव्याने उड्डाणपूल करण्यात येत आहे. पाचपावलीजवळदोन अंडरपासही तयार करण्यात येणार आहेत. दिघोरी चौकाच्या आधी चार पदरी अंडरपास करावी, अशी सूचना गडकरींनी केली.

हे सुद्धा वाचा