Nagpur Rain | नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जाहीर

| Updated on: Aug 09, 2022 | 10:47 AM

नागपूर जिल्हात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅंटिंग सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणे देखील शक्य होत नाहीयं. रस्त्यांवर देखील गुडघ्याभर पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागतंय.

Nagpur Rain | नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जाहीर
Follow us on

नागपूर : नागपुरात (Nagpur) गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नागपुरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून सर्वत्र पाणीच पाणी झालंय. रात्रीपासून काही भागात जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस (Rain) पडत आहे. यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळते. शहरातील सकल भागात पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होतंय. इतके नाही तर पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठी तारांबळ उडालीयं. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान (Damage) होत असून शेतजमिनी या पाण्याखाली गेल्या आहेत.

नागपूर जिल्हात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅंटिंग सुरू

नागपूर जिल्हात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅंटिंग सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणे देखील शक्य होत नाहीयं. रस्त्यांवर देखील गुडघ्याभर पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागतंय. त्यामध्येही या पावसामध्ये नागपूरच्या रस्त्यांचे तीन तेरा वाजले आहेत.

हे सुद्धा वाचा

हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला

आज सकाळपासून सुद्धा पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे वातावरणात मोठा गारवा निर्माण झाला असून नागपूर पूर्णपणे चिंब झाल आहे. हवामान विभागाने सुद्धा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. नागरिकांनी पावसामध्ये बाहेर पडताना काळजी घेण्याची आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. पावसानंतर नागपूरच्या रस्त्यांची चाळण झाली असून या रस्त्यावरून वाहने जीवमूठीत घेऊन चालवावी लागत आहेत.