Mahesh Shinde : ‘मी एकनाथ शिंदेचा पुतण्या’ असं खोटं सांगत फिरणाऱ्या महेश शिंदेला जुगार खेळताना अटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे यांचाही सहभाग असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Mahesh Shinde : 'मी एकनाथ शिंदेचा पुतण्या' असं खोटं सांगत फिरणाऱ्या महेश शिंदेला जुगार खेळताना अटक
वाशीतील बस स्टॉपवर महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंगImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 11:00 AM

भाईंदर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर सगळ्यांचंच बारीक लक्ष आहे. अशातच आता तर एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला अटक करण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं होतं. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुतणे महेश शिंदे यांना अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. पण अटक करण्यात आलेली व्यक्ती एकनाथ शिंदे यांचा पुतण्या नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिलीय.  क्राईम ब्रांच (Crime News) पोलिसांनी महेश शिंदे यांच्यावर अटकेची कारवाई केली. विशेष म्हणजे आधी चौकशी करुन महेश शिंदे (Mahesh Shinde arrest) यांना सोडून देण्यात आलं होतं. पण नंतर याप्रकरणी चर्चा आणि कुजबूज वाढल्याचं लक्षात आल्यानंतर पुन्हा रात्री उशिरा पोलिसांनी महेश शिंदे यांना ताब्यात घेत अटक केली, असाही दावा करण्यात आला होता. पण महेश शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्या आडनावातील समानतेमुळे चर्चांना उधाण आलंय. अखेर याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती देत, महेश शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय.

जुगार खेळताना अटक

शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे यांना काल रात्री गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी काशीमीराच्या हटकेश संकुलातून जीसीसी क्लबमध्ये जुगार खेळताना ताब्यात घेतले. महेश शिंदे स्वतःला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुतणे सांगतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे अनेक फोटो आहेत. महेश शिंदेसह चार ते पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

हे सुद्धा वाचा

शिंदे आडवानामुळे घोळ

एकनाथ शिंदे आणि महेश शिंदे यांच्या आडनावातील साधर्म्यामुळे महेश हा स्वतःला एकनाथ शिंदे यांचा पुतण्या असल्याची बतावणी करत होता. पण अखेर पोलिसांनी त्याचा  पर्दाफाश केला आहे. महेश शिंदे याचे एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे अनेक फोटोही एकत्र असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे खरंच हा एकनाथ शिंदे यांचा पुतण्या आहे की काय, यावरुन चर्चांना उधाण आलं होतं. पण अखेर पोलीस तपासात महेश शिंदे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जातेय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.