Video – नागपुरात नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयात राडा! काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप

| Updated on: Feb 27, 2022 | 2:11 PM

नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. भाजप कार्यालयात साहित्याची फेकाफेक करण्यात आली. यामुळं याठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Video - नागपुरात नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयात राडा! काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप
नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयात करण्यात आलेली तोडफोड.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : भाजप नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा (corporator Virendra Kukreja) यांचा आरोप आहे, की काँग्रेस कार्यकर्ता बाबूखान आणि त्याच्यासोबत आलेल्या काही महिला पुरुषांनी भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात वाद घातला. त्यानंतर तोडफोड करत तिथल्या साहित्याची नासधूस केली. वीरेंद्र कुकरेजा प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक आहे. मात्र समतानगर आणि सुगतनगर (Samtanagar and Sugatnagar) परिसरात त्यांचे लक्ष नाही. असा आरोप करत काँग्रेस कार्यकर्ता बाबू खानच्या (Congress activist Babu Khan) नेतृत्वात आज काही लोक कुकरेजा यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेले. भाजपच्या त्यांच्या कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं तिथं वाद निर्माण झाला. त्याची परिणीती कुकरेजा यांच्या कार्यालयातील तोडफोडमध्ये झाली.

जरीपटका पोलीस ठाण्यासमोर बंदोबस्त

नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. भाजप कार्यालयात साहित्याची फेकाफेक करण्यात आली. यामुळं याठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपेच कार्यकर्ते जरीपटका पोलीस स्टेशन समोर गेलेत. एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्याच्या तयारीत ते आहेत. जरीपटका पोलीस स्टेशनसमोर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

ही स्टंटबाजी तर नव्हे

कार्यालयातील साहित्याची फेकाफेक करण्यात आली आहे. त्यामुळं कुकरेजा यांच्या कार्यालयाचे नुकसान झाले आहे. यापूर्वीसुद्धा काही नागरिकांनी नगरसेवक कुकरेजा यांच्याशी वाद घातला होता. रस्त्यावरच त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तुमच्या काही तक्रारी असल्यास घरी भेटा, असं नागरिकांना सांगत होते. त्यावेळीसुद्धा काही नागरिक आक्रमक झाले होते. सध्या महापालिकेच्या निवडणुका असल्यानं ही स्टंटबाजी केली जात असल्याचं बोललं जातंय.

Nagpur Crime | व्हॉट्सअप स्टेट्सवरून वाद, वरातीत झाडल्या गोळ्या, नागपुरात रात्री नेमकं काय घडलं?

महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी होणारी प्रतापगडची यात्रा रद्द, गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे आदेश

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नागपूर कट्टा, बॉटनिकल गार्डनसाठी शोधताहेत फूलं!