AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रीय वयोश्री योजनेचे नोंदणी शिबिर आजपासून, नागपूर शहरातील नागरिकांना कसा घेता येणार लाभ

राष्ट्रीय वयोश्री योजना नागपूर शहरात राबविण्यात येत आहे. मनपाच्या दहाही झोनमध्ये नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी दहाही झोनमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ संबंधितांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय वयोश्री योजनेचे नोंदणी शिबिर आजपासून, नागपूर शहरातील नागरिकांना कसा घेता येणार लाभ
नागपूर महानगरपालिकेअतंर्गत वयोश्री योजनेची सुरुवात करण्यात आली.Image Credit source: tv 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Feb 27, 2022 | 12:44 PM
Share

नागपूर : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजने (National Forest Scheme) अंतर्गत मनपातर्फे शहरातील ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) व दिव्यांग (Disabled ) व्यक्तींना मदत पोहचविण्यात येत आहे. या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मनपाच्या दहाही झोनमध्ये वेगवेगळ्या दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नोंदणी शिबिराची सुरुवात 27 फेब्रुवारीपासून लक्ष्मीनगर झोन अंतर्गत विवेकानंदनगर येथील बॅडमिंटन हॉल येथून सकाळी झाली. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह झोन कार्यालयात जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक. मासिक उत्पन्न पंधरा हजार किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. पूर्ण पत्ता असल्याचा दाखला/आधार कार्ड. दोन पासपोर्ट फोटो.

शिबिराची झोननिहाय माहिती

  1. लक्ष्मीनगर झोन – 27 व 27 फेब्रुवारी – बॅडमिंटन हॉल, विवेकानंद नगर – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत. धरमपेठ झोन – 1 व 2 मार्च – अग्रसेन भवन, रवीनगर – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत.
  2. हनुमाननगर झोन – 3 व 4 मार्च – ईश्वर देशमुख महाविद्यालय सभागृह, क्रीडा चौक – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत गांधीबाग झोन – 5 व 6 मार्च – टाऊन हॉल, महाल – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत.
  3. सतरंजीपुरा झोन – 7 व 8 मार्च – मुदलियार सभागृह, शांतीनगर – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत. लकडगंज झोन – 9 व 10 मार्च – कच्छी विसा, ओसवाल समाजभवन, एव्हीजी लेआऊट, लकडगंज – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत.
  4. आशीनगर झोन – 11 व 12 मार्च – ललित कला भवन, ठवरे कॉलोनी, – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत. मंगळवारी झोन – 14 व 15 मार्च – स्वामी अय्यपा टेम्पल, श्याम लॉन जवळ, मानकापूर ते गोरेवाडा रिंग रोड – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत.
  5. धंतोली झोन – 16 व 17 मार्च – राष्ट्रसंत तुकडोजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अग्याराम देवी चौक, गणेशपेठ – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत. नेहरूनगर झोन – 19 व 20 मार्च – राजीव गांधी सभागृह, नंदनवन – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...