AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs WI : इंग्लंडचा वानखेडेत फिल्डिंगचा निर्णय, विंडीजला किती धावांवर रोखणार?

England vs West Indies Toss and Playing 11 : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघ सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही संघ आपला दुसरा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहेत.

ENG vs WI : इंग्लंडचा वानखेडेत फिल्डिंगचा निर्णय, विंडीजला किती धावांवर रोखणार?
Harry Brook ENG vs WI Toss T20I WC 2026Image Credit source: Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 11, 2026 | 7:22 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 15 व्या सामन्यात सी ग्रुपमधील 2 अजिंक्य आणि चॅम्पियन संघ आमनेसामने आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहेत. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकला. कॅप्टन हॅरी ब्रूक याने फिल्डिंगचा निर्णय करत वेस्ट इंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता इंग्लंडचे गोलंदाज कॅप्टन हॅरी ब्रूक याचा फिल्डिंग करण्याचा निर्णय योग्य ठरवण्यात यशस्वी ठरवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंग्लंड विंडीजला रोखण्यात यशस्वी ठरणार?

विंडीजच्या संघात एकसेएक आणि तोडीस तोड फलंदाज आहेत. विंडीजचा कोणता फलंदाज कधी किती मोठी खेळी करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे इंग्लंडचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय हा धाडसी समजला जात आहे. अशात आता विंडीज या संधीचा फायदा घेत इंग्लंडसमोर किती धावांचा डोंगर उभारणार? हे 20 ओव्हरनंतरच स्पष्ट होईल.

दोन्ही संघात प्रत्येकी 1-1 बदल

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1-1 बदल केला आहे. ल्यूक वूड याच्या जागी जेमी ओव्हरटन याला संधी देण्यात आली आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली होती.

विंडीजकडून कुणाचा समावेश?

तर दुसऱ्या बाजूला विंडीजला नाईलाजाने बदल करावा लागला आहे. मॅथ्यू फोर्ड याला या सामन्याला मुकावं लागलं आहे. मॅथ्यूच्या जागी रोस्टन चेज याला संधी मिळाली आहे.

विंडीज पहिल्या स्थानी

दरम्यान विंडीज सी ग्रुपमध्ये एका विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. त्यानंतर स्कॉटलँड दुसऱ्या स्थानी आहे. तर इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर नेपाळ आणि इटलीला अद्याप विजयाचं खातं उघडता आलेलं नाही.

वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन : ब्रँडन किंग, शाई होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकिल होसेन, गुडाकेश मोती आणि शमार जोसेफ.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात