AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : रोहित-विराटचा मोठा विक्रम धोक्यात, इंग्लंडचा फलंदाज रो-कोला पछाडण्यासाठी सज्ज, किती धावांची गरज?

Most Runs In T20i World Cup History : जोस बटलर याने नेपाळ विरुद्ध निर्णायक खेळी करत श्रीलंकेच्या दिग्गज महेला जयवर्धने याला मागे टाकलं. बटलरने यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज हा विक्रम आणखी भक्कम केला. आता बटलरला विराट आणि रोहितला पछाडण्याची संधी आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 08, 2026 | 9:54 PM
Share
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना थरार पाहायला मिळाला. नेपाळसारख्या संघाने इंग्लंडला झुंजवलं. इंग्लंडने हा सामना 4 धावांनी जिंकला. मात्र त्यानंतरही नेपाळच्या पराभवाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. इंग्लंडच्या जोस बटलर याने नेपाळ विरुद्ध छोटेखानी खेळी करुन खास कामगिरी केली. (Photo Credit : PTI)

1 / 5
इंग्लंडच्या अनुभवी विकेटकीपर बॅट्समनने नेपाळ विरुद्ध 17 चेंडूत 26 धावांची खेळी केली. जोसने या खेळीत 5 चौकार लगावले. जोसने यासह आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांबाबत श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने याला मागे टाकलं. (Photo Credit : PTI)

2 / 5
जयवर्धने याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 31 सामन्यांमध्ये 1 हजार 16 धावा केल्यात. तर बटलरच्या नावावर आता  36 सामन्यांमध्ये 1 हजार 39 धावा झाल्या आहेत. बटलर यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी भारताची माजी दिग्गज जोडी विराट कोहली आणि रोहित शर्मा विराजमान आहेत.  (Photo Credit : PTI)

3 / 5
विराटच्या नावावर टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. विराटने 35 सामन्यांमध्ये 1 हजार 292 धावा केल्या आहेत. तर रोहितने 47 सामन्यांत 1 हजार 220 रन्स केल्या आहेत. मात्र हे दोघेही टी 20i क्रिकेटमधून निवृत्त झालेत. त्यामुळे बटलरला हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
मात्र जोस बटलरसाठी हा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे. जोसला टी 20i वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावांचा विश्व विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 234 रन्स कराव्या लागणार आहेत.  (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना