AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: भारतीय संघाची सुपर ओव्हरवर मजबूत पकड, आकडेवारीवरून सगळं काही स्पष्ट

T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. त्यानंतर सुपर ओव्हरची चर्चा रंगली आहे. सुपर ओव्हरच्या खेळीत भारतीय संघाचा वरचष्मा आहे. हे आम्ही नाही तर आकडेवारी सांगत आहे. जाणून घ्या.

Team India: भारतीय संघाची सुपर ओव्हरवर मजबूत पकड, आकडेवारीवरून सगळं काही स्पष्ट
भारतीय संघाची सुपर ओव्हरवर मजबूत पकड, आकडेवारीवरून सगळं काही स्पष्टImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 11, 2026 | 7:04 PM
Share

Superover World Record: टी20 क्रिकेटमध्ये अनेकदा थरारक सामने पाहण्याची संधी मिळते. कधी कधी न जिंकणाऱ्या सामन्यातही उलटफेर होतो. कधी शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळतो. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. असं असताना अनेकदा सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये जातो. टी20 क्रिकेट सुरू झाल्यापासून अनेकदा हा प्रसंग घडला आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत नुकताच सुपर ओव्हरने निकाल लागला. दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात एक नाही तर दोन सुपर ओव्हर झाल्या. यात दक्षिण अफ्रिकेने 4 धावांनी विजय मिळवला. टी20 क्रिकेटचा इतिहास पाहिला आणि त्यात सुपर ओव्हरचा निकाल पाहिला तर भारताचा दबदबा दिसून येत आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या सुपर ओव्हरमध्ये विजयाची चव चाखली आहे. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये भारताला पराभूत करणं कठीण असल्याचं दिसून येत आहे. भारताने आतापर्यंत सहा सामने सुपर ओव्हरमध्ये खेळले आणि जिंकलेही.

सुपर ओव्हरमधील संघांची कामगिरी

  • अफगाणिस्तान – जिंकले: 0, पराभूत: 3
  • ऑस्ट्रेलिया – जिंकले: 1, पराभूत: 2
  • बांगलादेश – जिंकले: 0, पराभूत: 0
  • इंग्लंड – जिंकले: 2, पराभूत: 0
  • भारत – जिंकले: 6, पराभूत: 0
  • आयर्लंड – जिंकले: 1, पराभूत: 0
  • न्यूझीलंड – जिंकले: 2, पराभूत: 7
  • पाकिस्तान – जिंकले: 1, पराभूत: 3
  • दक्षिण आफ्रिका – जिंकले: 2, पराभूत: 0
  • श्रीलंका – जिंकले: 2, पराभूत: 4
  • वेस्ट इंडिज – जिंकले: 2, पराभूत: 1
  • झिम्बाब्वे – जिंकले: 2, पराभूत: 0

सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक पराभव पचवलेला संघ

सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक पराभवाचा मानकरी हा न्यूझीलंडचा संघ आहे. आतापर्यंत न्यूझीलंडने 9 सामने सुपर ओव्हरचे खेळले आहे. यात सात वेळा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर दोन सामन्यात विजय मिळाला आहे. इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेने प्रत्येकी दोन सुपर ओव्हर सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने तीन पैकी एक सामना जिंकला आणि 2 सामने गमावले आहेत. पाकिस्तानने चार पैकी 3 सामने गमावले. तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. झिम्बाब्वेने दोन पैकी दोन सामने जिंकलेत. श्रीलंकेने सहा पैकी 4 सामने गमावले आहेत. तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर बांगलादेशच्या वाटेला कधी सुपर ओव्हरची वेळ आली नाही.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड